यवतमाळ - जिल्ह्यात आज (20 मे) कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जवळपास दुप्पट आहे. आज जिल्ह्यात 443 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 823 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 7 मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, एक मृत्यू डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये तर 6 मृत्यू खासगी रुग्णालयातील आहेत. तसेच 14 पैकी 2 मृत्यू अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील आहेत. गुरुवारी एकूण 7972 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 443 जण नव्याने पॉझिटिव्ह आढळले. तर 7529 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.
मृत्यूदर 2.41 टक्क्यांवर
सद्यस्थितीत जिल्ह्यात 3654 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यापैकी रुग्णालयात 1855 तर गृह विलगीकरणात 1799 रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 69744 झाली आहे. गेल्या 24 तासात 823 जण कोरानामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्तांची एकूण संख्या 64410 झाली आहे. जिल्ह्यात एकूण 1680 मृत्यूंची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 12.45, मृत्यूदर 2.41 टक्के आहे.
रुग्णालयात 1293 बेड उपलब्ध
यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि 32 खासगी कोविड हॉस्पीटलमध्ये, असे मिळून एकूण 2244 बेड आहेत. यापैकी 951 बेड रुग्णांसाठी वापरात आहेत. तर, 1293 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 311 बेड रुग्णांसाठी उपयोगात आहेत. 266 बेड शिल्लक आहेत. 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 143 रुग्णांसाठी उपयोगात आहेत. 383 बेड शिल्लक आहेत. 32 खासगी कोविड रुग्णालयात एकूण 1141 बेडपैकी 497 उपयोगात तर 644 बेड शिल्लक आहेत.
हेही वाचा - 'पी-305 बार्ज' : मृतांचा आकडा 49 वर; बचावकार्य सुरुच