यवतमाळ - नगर पालिकेने नाल्याची सफाई न केल्याने पहिल्याच पावसाने शहरातील नाल्याच्या काठावरील घरात पाणी घुसल्याने आपत्तीचा सामना करावा लागला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. दुपारी आलेल्या पावसामुळे शहरातील तलाव फैल भागातील नाल्याला पूर आला. या पुरामुळे काठावर राहणाऱ्या जवळपास 60 घरामध्ये पाणी, चिखल आणि गाळ घुसून त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
नुकसानभरपाईची मागणी -
शासनाच्या आपत्ती निवारण आणि हवामान खात्याच्या खबरदारी घेण्याचा सूचना दिल्या होत्या. पदाधिकारी आणी आरोग्य व नियोजन विभागाने याची कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही. या हलगर्जीपणामुळे या भागातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी घुसून नुकसान झाल्याची नागरिकांच्यात चर्चा आहे. ज्यांचे नुकसान झाले त्यांना नगर पालिका आणि शासनाने मदतीचा हात व नुकसानभरपाई देण्याची मागणी केली असून नाल्यांची साफसफाई करण्यात यावी, अशी ही मागणी केली आहे.