ETV Bharat / state

खावटी कर्ज आणि ओल्या दुष्काळासाठी घाटंजी तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा

आदिवासी समाजाला कुठलेही निकष न लावता खावटी कर्ज मंजूर करण्यात यावे, तसेच घाटंजी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि गोंडवाना संग्राम परिषद यांच्यावतीने सोमवारी बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आणि नूकसानग्रस्त शेतकरी सहभागी झाले होते.

VBA movement news
खावटी कर्जासाठी बैलबंडी मोर्चा
author img

By

Published : Nov 2, 2020, 9:58 PM IST

यवतमाळ - आदिवासी समाजाला कुठलेही निकष न लावता खावटी कर्ज मंजूर करण्यात यावे, तसेच घाटंजी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि गोंडवाना संग्राम परिषद यांच्यावतीने सोमवारी बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आणि नूकसानग्रस्त शेतकरी सहभागी झाले होते.

खावटी कर्जासाठी बैलबंडी मोर्चा

आदिवासी समाजाला खावटीचा लाभ मिळण्यासाठी शासनाने अनेक जाचक अटी लावल्यामुळे, गोंड समाज व इतर आदिवासी जमाती खावटीपासून वंचित आहेत. खावटीवर आदिवासी समाजाचा हक्क आहे, त्यांना त्यांच्या हक्काची खावटी मिळालीच पाहिजे, तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांवर दुपार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यातच शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील झाली नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, सीसीआईची कापूस खरेदी सुरू करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

खावटी कर्ज म्हणजे काय?

सविधानाच्या कलम ४६ अनुसार आदिवासी समाजाचे सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक, राजकीयदृष्ट्या तसेच अन्याय व शोषण यापासून त्यांचे संरक्षण, आणि अन्न, वस्त्र व निवारा या मुलभूत गरजा त्यांना पुरवण्याचे अभिवचन देण्यात आले आहे. जुन ते सप्टेंबर या कालावधीत आदिवासी समाजाच्या दुर्गम वस्त्यांमध्ये रोजगार उपलब्ध होत नाही. पैशाअभावी त्यांची उपासमार होऊ नये, यासाठी त्यांना शासनाकडून मदत करण्यात येते. यालाच खावटी कर्ज असे म्हणतात कलम 46 मध्ये त्याची तरतुद करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यापूर्वी वंचितने केले होते घुगरी आणि चटणीभाकर आंदोलन

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यापूर्वी वंचित बहुजन आघाडीकडून चटणी भाकर आंदोलन देखील करण्यात आले होते. या आंदोलनातून शेतकऱ्यांच्या व्याथा शासनापर्यंत पोहचवण्यात आल्या होत्या. मात्र त्याचा उपयोग न झाल्याने आज पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.