यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. सलग दोन दिवस (दि. 28 व 29 एप्रिल) कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्यांचा आकडा जास्त आहे. ही नक्कीच जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. आज तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा तब्बल 249 ने जास्त होती. गत 24 तासांत जिल्ह्यात 855 जण नव्याने पॉझिटिव्ह आले असून 1 हजार 104 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 31 मृत्यू झाले. यातील 21 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, चार मृत्यू कोविड हेल्थ सेंटरमध्ये तर सहा मृत्यू खासगी रुग्णालयात झाले.
मृत्यूदर 2.40 टक्क्यांवर
आज (दि. 29 एप्रिल) एकूण 5 हजार 546 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 855 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर 4 हजार 691 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 831 रुग्ण सक्रिय रुग्ण असून यापैकी रुग्णालयात भरती 2 हजार 524 तर गृह विलगीकरणात 4 हजार 307 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 51 हजार 850 झाली आहे. 24 तासात 1 हजार 104 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 43 हजार 776 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 हजार 243 मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.60 असून मृत्यूदर 2.40 आहे.
6 हजार 777 नमुने अप्राप्त
पॉझिटिव्ह आलेल्या 855 जणांमध्ये 542 पुरुष आणि 313 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 208 पॉझिटिव्ह रुग्ण, वणी 46, पांढरकवडा 129, घाटंजी 41, दारव्हा 128, उमरखेड 13, आर्णि 35, दिग्रस 50, पुसद 55, नेर 36, महागाव 14, मारेगाव 30, झरीजामणी 33, बाभुळगाव 5, राळेगाव 20, कळंब 6 आणि इतर शहरातील 6 रुग्ण आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत 4 लाख 11 हजार 544 नमुने पाठविले असून यापैकी 4 लाख 4 हजार 767 प्राप्त तर 6 जार 777 अप्राप्त आहेत. तसेच 3 लाख 52 हजार 917 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले आहे.
हेही वाचा - एसपी यवतमाळ नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट; अनेक मित्रांना केली पैशांची मागणी