यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाचा दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 24 तासांत जिल्ह्यात एकूण 26 कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले आहे. यातील 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तर 4 रुग्णांचा मृत्यू खाजगी रुग्णालयात झाला. मृतांपैकी 4 रुग्ण हे यवतमाळ जिल्ह्याबाहेरील आहे. दरम्यान, आज 1237 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 660 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत सर्वाधिक मृत्यू आणि पॉझिटीव्ह रुग्ण येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आज 26 रुग्णांचा मृत्यू -
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या मृतांमध्ये यवतमाळ येथील 36, 55, 47, 82, 51, 69 वर्षीय पुरुष व 47 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष व 68 वर्षीय महिला, मारेगाव तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 47 वर्षीय महिला व 61 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 80 वर्षीय पुरुष व दिग्रस तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष, आर्णी येथील 68 वर्षीय पुरुष, कळंब येथील 75 वर्षीय महिला, वणी येथील 75 वर्षीय महिला, नेर तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, नागपूर येथील 70 वर्षीय महिला, वरोरा येथील 65 वर्षीय पुरुष, धामणगाव येथील 55 वर्षीय पुरुष आणि मानोरा (जि.वाशिम) तालुक्यातील 26 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर खाजगी रुग्णालयात मृत्यू झालेल्यांमध्ये पुसद येथील 45 व 65 वर्षीय महिला, यवतमाळ येथील 59 वर्षीय महिला आणि देवळी (जि.वर्धा) तालुक्यातील 80 वर्षीय पुरुष आहे.
एकूण 4987 सक्रिय रुग्ण -
पॉझिटीव्ह आलेल्या 1237 जणांमध्ये 727 पुरुष आणि 510 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 431 पॉझिटीव्ह रुग्ण, पुसद 107, पांढरकवडा 105, उमरखेड 98, कळंब 90, वणी 77, दिग्रस 69, मारेगाव 45, घाटंजी 41, आर्णि 31, बाभुळगाव 30, नेर 30, महागाव 22, झरीजामणी 20, दारव्हा 18, राळेगाव 9 आणि इतर शहरातील 14 रुग्ण आहे. आज एकूण 4929 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1237 जण नव्याने पॉझिटीव्ह आले, तर 3692 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4987 सक्रिय रुग्ण असून यापैकी रुग्णालयात भरती 2430, तर गृह विलगीकरणात 2557 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 38524 झाली आहे. जिल्ह्यात एकूण 843 मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.60 असून मृत्यूदर 2.19 टक्के आहे.
अशी आहे उपलब्ध बेडची आकडेवारी -
जिल्ह्यातील रुग्णालयात असलेल्या बेडची उपलब्धतामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 577 बेडपैकी 19 बेड शिल्लक आहेत. दारव्हा येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 50 पैकी 14 बेड शिल्लक, पुसद येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 50 पैकी 37 बेड शिल्लक आणि पांढरकवडा येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 60 पैकी 20 बेड शिल्लक आहेत. तर जिल्ह्यातील 19 खाजगी कोविड रुग्णालयांमध्ये 239 बेड शिल्लक आहेत.
हेही वाचा - सरसंघचालक मोहन भागवतांना कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज, विलगीकरणात राहण्याच्या सूचना