यवतमाळ : बर्डफ्लूची दहशत संपत नाही तोच अज्ञात आजाराने कोंबड्या मृत्युमूखी पडल्याचा प्रकार जिल्ह्यातील नेर येथे घडला आहे. यामुळे कुक्कुटपालक चिंतेत आहेत. मृत कोंबड्या यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले.
यवतमाळमध्ये अज्ञात आजाराने शंभर पेक्षा अधिक कोंबड्यांचा मृत्यू नेरमध्ये भीतीचे वातावरणातजिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे आधीच लोक धास्तावले आहेत. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. यातच कोंबड्यांना नवीन रोगाची लागण झाली आहे. अशातच अज्ञात आजाराने शेख नदीम यांच्या जवळपास शंभराहून कोंबड्या मृत्युमूखी पडल्या आहेत. यामुळे शेख यांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. ज्या कोंबड्या मृत्युमूखी पडल्या आहेत त्या बेरड जातीच्या कोंबड्या आहेत. या कोंबड्या लढाऊ म्हणून ओळखल्या जातात. बाजारात या कोंबड्यांची किंमत एक हजार ते १५०० आहे. या कोंबड्यांच्या मृत्यूचे कारण पशु वैद्यकीय अधिकारी शोधत आहेत.
हेही वाचा- Live Updates : वाझे-मनसुख प्रकरण: वाझेंना अटक बेकायदेशीर; मुंबई न्यायालयात याचिका दाखल