ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यात रस्ते अपघातात दरवर्षी 300 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू

वाहनाचा वाढणारा वेग जिवावर बेतत आहे. गेल्या काही वर्षांत दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अपघातामध्ये देखील वाढ झाली आहे. तसेच महामार्गाचे रुंदीकरण झाल्यापासून सिमेंट रोडवर होणार्‍या अपघाताच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे.

yavatmal
यवतमाळ जिल्ह्यात रस्ते अपघातात दरवर्षी 300 पेक्षा जास्त मृत्यू
author img

By

Published : Jan 28, 2020, 1:28 PM IST

Updated : Jan 29, 2020, 10:23 AM IST

यवतमाळ - जिल्ह्यात 2018 या वर्षात 1401 अपघात झाले. त्यामध्ये 350 जणांचा मृत्यू झाला, 2019 मध्ये झालेल्या 1 हजार 048 अपघातात 366 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरवर्षी रस्त्यावर होणाऱ्या अपघातामध्ये जिल्ह्यात जवळपास ३५० मृत्यू होत असल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल किनगे यांनी सांगितले.

हेही वाचा - यवतमाळ विधानपरिषद निवडणूक : महाविकास आघाडीने कसली कंबर, आण्णाराव पाटील प्रचारासाठी दाखल

वाहनाचा वाढणारा वेग जिवावर बेतत आहे. गेल्या काही वर्षांत दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्तेही चकाचक झाले आहेत. त्यामुळे वाहनचालक कोणतीही पर्वा न करता भरधाव वाहने चालवितात. निष्काळजीपणामुळे आपला किंवा दुसर्‍या व्यक्तीचा जीव जाईल, याचा विचार करीत नाहीत.

यवतमाळ जिल्ह्यात रस्ते अपघातात दरवर्षी 300 पेक्षा जास्त मृत्यू

बहुतांश चालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. हेल्मेट अपवादानेच वापरले जाते. जास्तीत जास्त मृत्यू हे डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानेच होत असल्याचे वास्तव आहे. महामार्गाचे रुंदीकरण झाल्यापासून सिमेंट रोडवर होणार्‍या अपघातात डोक्याला दुखापत होऊनच मृत्यू होत असल्याचे किनगे यांनी सांगितले. तसेच आपला आणि दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षित वाहन चालवण्याला प्राधान्य द्यायला पाहिजे, असेही ते म्हणाले.

Intro:Body:यवतमाळ : लवकर पोहोचण्यासाठी वाढविण्यात येणारा वाहनाचा वेग जिवावर बेतत आहे. रस्त्यावर होणार्‍या अपघातांत जिल्ह्यात वर्षाला 350 च्या आसपास मृत्यू होतात.

गेल्या काही वर्षांत दुचाकी व चारचाकी वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्तेही चकाचक झालेले आहेत. त्यामुळे वाहनचालक कोणतीही पर्वा न करता भरधाव वाहने चालवितात. निष्काळजीपणामुळे आपला किंवा दुसर्‍या व्यक्तीचा जीव जाईल, याचा विचार करीत नाहीत.

बहुतांश चालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. हेल्मेट अपवादानेच वापरले जाते. जास्तीत जास्त मृत्यू हे डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानेच होत असल्याचे वास्तव आहे. महामार्गाचे रुंदीकरण झाल्यापासून सिमेंट रोडवर होणार्‍या अपघातांत डोक्याला दुखापत होऊनच मृत्यू होत असल्याचे पोलिस सांगतात. सन 2018 या वर्षात 1401 अपघात झाले. त्यात 350 जणांचे मृत्यू झाला. 2019मध्ये झालेल्या 1048 अपघातांत 366 मृत्यू झाले. आपला आणि दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षित वाहन चालवण्याला प्राधान्य द्यायला पाहिजे.

बाईट- अनिल किनगे, वाहतुक पोलीस निरीक्षकConclusion:
Last Updated : Jan 29, 2020, 10:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.