ETV Bharat / state

Sunil Diware Murder Case : आमदार संजय राठोड यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिक एसपी कार्यालयात; केल्या 'या' मागण्या - सुनील डीवरे हत्या शिवसैनिक आक्रमक

शिवसैनिक सुनील डीवरे यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ( Sunil Diware Murder Case ) या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, यासाठी आमदार संजय राठोड ( Mla Sanjay Rathod ) यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिकांनी एसपी कार्यालयावर धडक दिली.

Mla Sanjay Rathod with Shivsainik present at sp office yawatmal
आमदार संजय राठोड यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिक एसपी कार्यालयात
author img

By

Published : Feb 5, 2022, 7:06 PM IST

Updated : Feb 5, 2022, 7:58 PM IST

यवतमाळ - शिवसैनिक सुनील डीवरे यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ( Sunil Diware Murder Case ) या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, यासाठी आमदार संजय राठोड ( Mla Sanjay Rathod ) यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिकांनी एसपी कार्यालयावर धडक दिली. ( Shivsainik in SP Office Yawatmal ) जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हकालपट्टीचीही मागणीही जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर व शिवसैनिकांनी केली आहे.

याबाबत बोलताना आमदार संजय राठोड

जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला वेळीच आळा घालावा अन्यथा शिवसैनिक जिल्हा पोलीस दलाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन उभारेल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांना शिवसैनिकांनी दिला. जिल्हाप्रमुख पराग पिंगळे माजी आमदार विश्वास नांदेकर राजेंद्र गायकवाड यास असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

  • शिवसैनिकांच्या मागण्या काय?
  1. हत्या प्रकरणातील उर्वरित तीन फरार आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी
  2. या हत्याकांडात पडद्यामागून ज्यांनी भूमिका बजावली व मदत केली त्यांचा तपास करून गुन्हे दाखल करण्यात यावे
  3. अवैध बंदुका कोणी पुरवठा केला या संपूर्ण कडीचादेखील तपास करण्यात यावा
  4. अवैध बंदुका पुरवठादारांनी पुरवठा केलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन बंदुका जप्त करण्यात याव्या
  5. फरार गुन्हेगारांना न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळू नये यासाठी ठोस पावले उचलावी
  6. अवैध शस्त्र व गांजा हे ज्याच्या नशेत तरुणाई हे सर्व प्रकार करीत आहे त्यांचाही बिमोड करण्यात यावा
  7. यवतमाळ शहरात व ग्रामीण भागात गांजा पुरवठा करणारे रॅकेट व गांजा पिणारे ज्याठिकाणी नियमित बसतात त्या जागांवर देखरेख करणारे पथक निर्माण करण्यात यावे

हेही वाचा - Attack On Kirit Somaiya : शिवसेना कार्यकर्त्यांकडून भाजपा नेते किरीट सोमैयांवर हल्ला

शिवसेनेच्या या मागण्यांबाबत पोलीस दलाकडून त्वरित पावले उचलली गेली नाहीत तर या सर्व विषयावर शिवसेनेतर्फे पोलीस प्रशासनाविरोधात मोर्चा काढून आंदोलन उभारेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Last Updated : Feb 5, 2022, 7:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.