ETV Bharat / state

लॉकडाऊन काळात अनेकांच्या व्यवसायावर संक्रांत, व्यावसायिकांनी जगायचे तरी कसे? - corona updates yavatmal news

लॉकडाऊनकाळात बंद पडलेली अनेक दुकाने, आस्थापना केंद्र अनलॉक प्रक्रियेत सुरू होत आहेत. यामुळे लहान-मोठ्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. तर, काही व्यवसाय अद्याप बंद असल्याने ते शासनाच्या परवानगीची वाट बघत आहेत.

लॉकडाऊन काळात अनेकांच्या व्यवसायावर संक्रांत

author img

By

Published : Oct 4, 2020, 4:15 PM IST

Updated : Oct 4, 2020, 8:03 PM IST

यवतमाळ - कोरोनामुळे अनेक व्यवसाय, उद्योगधंदे बंद झाले. लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. मात्र, आता अनलॉक प्रक्रियेमुळे हळूहळू अनेक व्यवसाय पुन्हा सुरू होत आहेत. परंतु, कोरोनाची दहशत अद्याप असल्याने सर्वांच्याच मनात भीतीचे वातावरण आहे.

लॉकडाऊन काळात अनेकांच्या व्यवसायावर संक्रांत

लॉकडाऊनकाळात बंद पडलेली अनेक दुकाने, आस्थापना केंद्र अनलॉक प्रक्रियेत सुरू होत आहेत. यामुळे लहान-मोठ्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. तर, काही व्यवसाय अद्याप बंद असल्याने ते शासनाच्या परवानगीची वाट बघत आहेत. लॉकडाऊन कालावधीत पानठेले, पानटपऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून पान विक्रीसारख्या लहान व्यवसायाला उतरळती कळा लागली. तर, अनलॉकमध्ये पान सेंटर सुरू तर झाले. परंतु, ग्राहक पान खात नाहीत, त्यामुळे विक्रेत्यांकडील पानाच्या मागणीत घट झाली आहे. परिणामी अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करणाऱ्यां लोकांवर आर्थिक संकट कोसळले असून व्यवसायाला उतळती कळा लागली आहे.

तर, दुसरीकडे ज्यांचे व्यवसाय अद्याप सुरू झालेले नाही त्यांची अवस्था याहुन बिकट आहे. लॉकडाऊनमुळे लग्नसमारंभ, सार्वजनिक उत्सव इत्यादी साधेपणे पार पडले. त्यामुळे, बँड व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसाय ठप्प पडल्याने बँड व्यावसायिकांनी जगायचे तरी कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील दीड महिन्यांपासून अनेक व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली जात आहे. मात्र बँड वाजविण्याचा व्यवसाय करून पोट भरणार्‍यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष गेले नाही. या व्यवसायाव्यतिरिक्त त्यांच्याकडे उपजीविकेचे दुसरे कोणतेही साधन नाही. त्यामुळे कुटुंबाचा गाडा ओढणे कठीण झाले आहे.

कोरोना आल्यापासून व्यवसाय ठप्प झाला आहे. शासनाकडून पाच किलो धान्यात महिनाभर पोट भरत नाही. सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत नाही. हाताला कोणतेही काम नाही. व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, यासाठी जिल्हाधिकारी यांना वारंवार विनंती व निवेदनही देण्यात आले आहे. मात्र कुठलीही दखल घेतल्या गेली नाही. इतक्या वर्षात कधीच अशी वेळ आली नाही असे हे लोक सांगतात.

अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असून अनेक आस्थापना सुरू करण्यास सरकार परवानगी देत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करून आगामी सण, उत्सव, लग्न समारंभ व सार्वजनिक कार्यक्रमात बँड वाजवण्यास परवानगी द्यावी. अन्यथा आर्थिक साहाय्य द्यावे, अशी मागणी बँड व्यावसायिक करत आहेत.

Last Updated : Oct 4, 2020, 8:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.