ETV Bharat / state

कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी, मनुष्यबळ कमी असल्याने धिम्यागतीने खरेदी सुरु - यवतमाल कृषी बाजार समिती

दररोज 700 ते 800 वाहने भरून कापूस येत असल्याचे चित्र यवतमाळ बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवस बाजार समितीमध्ये मुक्कामी राहावे लागत आहे.

कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी
कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी
author img

By

Published : Feb 26, 2020, 1:01 AM IST

यवतमाळ - बाजार समितीमध्ये कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांग पाहायला मिळत आहे. व्यापाऱ्यांनी खासगीमध्ये दर घसरविल्याने शेतकऱ्यांनी पणन व सीसीआयला कापूस विक्रीसाठी आणला आहे. अशातच मागील तीन दिवस कापूस खरेदी बंद होती. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी शेतकऱ्यांनी विक्री केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

दररोज 700 ते 800 वाहने भरून कापूस येत असल्याचे चित्र यवतमाळ बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस विक्रीचे टोकन घेण्यासाठी शेतकरी येत आहेत. विशेष म्हणजे कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवस बाजार समितीमध्ये मुक्कामी राहावे लागत आहे. त्यामुळे आता वाहनांच्या रांगा बाजार समितीबाहेर पाहायला मिळत आहे.

कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

शेतकऱ्यांचा सर्व कापूस लवकर खरेदी केला गेला, तरच त्याचा फायदा आहे, असे शेतकरी नेते सांगतात. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले आहे. बाहेर खरेदी होत नसल्याने पणन व सीसीआयकडे शेतकरी कापूस घेऊन येत आहेत. कापूस खरेदी केंद्रावर मनुष्यबळ कमी असल्याचे सांगत पणन केंद्रावर धिम्यागतीने कापूस खरेदी सुरू आहे. याच चालढकलचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.