ETV Bharat / state

कोरोनावरील लसीचा माकडांवर होणार प्रयोग.. राज्य शासनाने दिली परवानगी - राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थान पुणे

जगभरात थैमान घातलेल्या कोरोनावर लस शोधण्यासाठी आणि त्या लसीचा प्रयोग करण्यासाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थेला (एनआयव्ही) 30 रेसस माकडे आणण्याची परवानगी शासनाने दिली आहे.

corona vaccine
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Jun 7, 2020, 7:45 AM IST

Updated : Jun 7, 2020, 12:42 PM IST

मुंबई/यवतमाळ - राज्य शासनाने 30 माकडे (रेसस प्रजातीची) पकडण्याची परवानगी दिली आहे. या माकडांवर कोरोनावरील लसीचे प्रयोग करण्यात येणार आहेत, अशी माहिती पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) शनिवारी (दि.6जून) दिली.

माहिती देताना वनमंत्री संजय राठोड

रेसस प्रजातीच्या माकडांचा वापर विविध रोगांवरी लसीच्या संशोधनासाठी केला जातो. ही माकडे मुख्यत्वे दक्षिण आणि पूर्व अशियामध्ये आढळतात. कोणत्याही लसीचा प्रयोग करण्यासाठी ऱ्हेसस प्रजातीच्या 4 ते 5 वर्षांच्या माकडांचा वापर केला जातो, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.

शासनाकडून देण्यात आलेल्या या परवानगीमध्ये काही अटीही घालण्यात आल्या आहेत. अनुभवी वन कर्मचाऱ्यांकडूनच या माकडांना पकडण्यात यावे, लसीच्या प्रयोगावेळी माकडाला कोणतीही इजा होणार नाही याची काजळी घ्यावी, या माकडांचा कोणत्याही प्रकारे व्यवसायिक वापर होणार नाही. या माकडांना अत्यंत सुरक्षितपणे हताळण्यात यावे, अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - खासगी लॅबकडून होणाऱ्या कोरोना चाचणीच्या शुल्क निश्चितीसाठी समिती स्थापन

Last Updated : Jun 7, 2020, 12:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.