ETV Bharat / state

राष्ट्रीयकृत बँकेचा कर्जवाटपात आखडता हात; केवळ तेराशे कोटी रुपयांचे कर्ज वाटप - पीककर्ज

जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँका खाजगी व जिल्हा मध्यवर्ती व विदर्भ कोकण बँक सर्व बँकेची मिळून दोन लाख 98 हजार खातेदार आहेत. मात्र यातील केवळ एक लाख 56 हजार 797 शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले. अनेक शेतकऱ्यांचे दोन ते तीन बँकेत खाते असल्याने कर्जवाटपात बँकांना अडसर होत आहेत. त्यामुळेच राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्जवाटप देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराच्या दारी जावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

केवळ तेराशे कोटी रुपयांचे कर्ज वाटप
केवळ तेराशे कोटी रुपयांचे कर्ज वाटप
author img

By

Published : Aug 4, 2021, 3:13 PM IST

यवतमाळ - यावर्षी खरीप कर्ज वाटपामध्ये जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, खाजगी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेला प्रशासनाकडून 2204 कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. आतापर्यंत एक लाख 57 हजार 797 शेतकऱ्यांना 1341 कोटी 91 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. असे असले तरी अजूनही राष्ट्रीयकृत व खासगी बँकांचे कर्ज वाटप हे 48 टक्क्यांवर अडकले आहेत तर एकट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने 94 टक्के कर्ज वाटप केले. राष्ट्रीयकृत व खासगी बँकांनी आपला कर्ज वाटपाची टक्केवारी वाढल्यास जिल्ह्यातील शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही.

राष्ट्रीयकृत बँकेचा कर्जवाटपात आखडता हात

2204 कोटींचे वाटपाचे उद्दिष्ट

खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यासाठी बँकांना दोन हजार दोनशे कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत एक हजार तीनशे कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. एकूण टक्केवारी 61 इतकी आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 602 कोटी रुपयांचे वाटप केले. त्यांची टक्केवारी 94 आहे तर राष्ट्रीयकृत बँकांनी 48 टक्के वाटप केले आहे. विभागात यवतमाळ जिल्हा पीककर्ज वाटपात अव्वल आहे. कोरोनामुळे यंदा तालुक्यात शिबिर घेता आले नाही, मात्र 31 जुलै पर्यंत 75 टक्के कर्ज वाटप होईल अशी अपेक्षा जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी व्यक्त केली.

केवळ तेराशे कोटी रुपयांचे कर्ज वाटप
केवळ तेराशे कोटी रुपयांचे कर्ज वाटप

जिल्ह्यात तीन लाख खातेदार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.