यवतमाळ - जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील शिरपुल्ली जंगलामधील शिरमाळ बिटलगत एका शेतकऱ्याच्या शेताजवळ अडीच वर्षाचे नर जातीचे बिबट मृत अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला देण्यात आली.

त्यानंतर बिबटचा पंचनामा करून त्याच्या शरीरावर काही जखमा आहे काय किंवा यावर काही विषप्रयोग झाला आहे का, याचा तपास केला जात आहे. या बिबट्याला विषबाधा झाल्याचे बोलले जात आहे. परंतु, शवविच्छेदनानंतर बिबटच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे येणार आहे.