ETV Bharat / state

विधान परिषद पोटनिवडणूक; महाविकास आघाडी म्हणते आम्ही 350 पार...

राज्यात सत्ता स्थापनेवेळी महाविकास आघाडीने 'आम्ही 162' असे म्हणत एकजुटीची शपथ घेतली होती. त्याच पध्दतीने यवतमाळ विधान परिषदेच्या पोट निवडणुकीसाठी 'आम्ही 350 पार' अशी शपथ पक्ष प्रमुखांचे स्मरून करुन घेतण्यात आली.

legislative-council-by-election-in-yavatmal
legislative-council-by-election-in-yavatmal
author img

By

Published : Jan 20, 2020, 8:58 PM IST

यवतमाळ- विधान परिषदेच्या पोट निवडणुकीत जिल्ह्यात रंगत निर्माण झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आज महाविकास आघाडीने 'आम्ही 350 पार' असा नारा देत एकजुटीची शपथ घेतली. ही निवडणूक महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची असून उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांना जिंकून द्यावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी मतदारांना केले.

विधान परिषद पोटनिवडणूक

हेही वाचा- 'आर्थिक विषयांवर केंद्र सरकारचं वागण एखाद्या दारुड्यासारखं'

राज्यात सत्ता स्थापनेवेळी महाविकास आघाडीने 'आम्ही 162' असे म्हणत एकजुटीची शपथ घेतली होती. त्याच पध्दतीने यवतमाळ विधान परिषदेच्या पोट निवडणुकीसाठी 'आम्ही 350 पार' अशी शपथ पक्ष प्रमुखांचे स्मरून करुन घेण्यात आली. यावेळी राज्याचे वन मंत्री संजय राठोड, कॉंग्रेस नेते माणिकराव ठाकरे, विजय दर्डा, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, माजी मंत्री मनोहर नाईक, आमदर इंद्रनील नाईक, आमदर ख्वाजा बेग, आमदर वजाहत मिर्झा यांच्यासह जिल्ह्यातील सर्व कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेचे मातबर नेते सहभागी झाले होते.

ही निवडणूक प्रतिष्ठेची असून उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांना जिंकून द्यावे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी मतदारांना विनंती केली. तर भाजपचे 50 ते 60 मतदार आमच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे विधान परिषदची निवडणूक मोठी रंगतदार होणार असल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. मात्र, मतदार फोडाफोडीचे राजकारण या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.

Intro:Body:यवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेची पोट निवडणूक मध्ये रंगत निर्माण झाली असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडी चे एकत्रीकरण करून आघाडीच्या मतदारांचे शक्तिप्रदर्शन करीत महाविकास आघाडीच्या मतदारांना एकजूटीची शपथ देण्यात आली.
ज्या पद्धतीने राज्यात सत्ता स्थापने वेळी महाविकास आघाडीने हॉटेलमध्ये आम्ही 162 असे सांगून एकजुटीची शपथ घेन्यात आली होती त्याच पध्दतीने आज यवतमाळ विधान परिषद पोट निवडणूकच्या अनुषंगाने आज महाविकास आघाडीने एकत्रीकरण करीत आम्ही 350 पार अशी ग्वाही देत नेत्यांना पक्ष प्रमुखांना स्मरून एकनिष्ठतेची शपथ घेतली. या बैठकीला राज्याचे वन मंत्री संजय राठोड, कॉग्रेस नेते माणिकराव ठाकरे, विजय दर्डा, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, माजी मंत्री मनोहर नाईक आमदर इंद्रनील नाईक, आमदर ख्वाजा बेग, आमदर वजाहत मिर्झा आदीसह जिल्ह्यातील सर्व कॉग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेस शिवसेनेचे मातबर नेते सहभागी झाले होते. या बैठकीत पालकमंत्री संजय राठोड यांनी महाविकास आघाडीसाठी निवडणूक प्रतिष्ठची असून उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांना जिंकून द्यावे यासाठी मतदारांना त्यांनी विनंती केली. तर आमच्या संपर्क मध्ये भाजपचे 50 ते 60 मतदार असल्याचे सांगून एक प्रकारे विजयाच गणित मांडले. त्यामुळे ही विधान परिषदची निवडणूक मोठी रंगतदार होणार असल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. मोठ्या प्रमाणात मतदार फोडाफोडीचा राजकारण या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.

बाईट: संजय राठोड पालकमंत्री Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.