यवतमाळ - हिंगणघाट येथील एका प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर सर्व स्तरांतून घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
असे प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी संबंधित नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी मारेगाव तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. यासाठी नायब तहसीलदार अनमोल कांबळे यांच्या मार्फत गृहमंत्री अनिल देशमुखांना निवेदन देण्यात आले.
महिलांवर होणारे अत्याचार पाहता महिला वर्ग असुरक्षित असल्याची भावना यावेळी महिलांनी बोलून दाखवली. या निंदनीय घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी उपस्थित महिलांनी केली.