ETV Bharat / state

यवतमाळमध्ये काँग्रेसकडून ७ मतदारसंघासाठी ८६ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

यवतमाळ जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षांकडून इच्छुक ८६ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात या मुलाखती घेण्यात आल्या.

काँग्रेसकडून ७ मतदारसंघासाठी ८६ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
author img

By

Published : Aug 2, 2019, 4:39 PM IST

Updated : Aug 2, 2019, 5:15 PM IST

यवतमाळ - विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. तर यवतमाळ जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षांकडून इच्छुक ८६ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.

काँग्रेसकडून ७ मतदारसंघासाठी ८६ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे माझी अध्यक्ष नाना गावंडे (नागपूर), माजी आमदार बबनराव तायवाडे, श्यामबाबू उमाळकर (निरीक्षक), जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

वणी विधानसभेसाठी १८, राळेगाव विधानसभेसाठी १३, यवतमाळ विधानसभेसाठी १७, दारव्हा दिग्रस विधानसभेसाठी ८, आर्णी केळापुर विधानसभेसाठी ८, पुसद विधानसभेसाठी ९ तर उमरखेड विधानसभा संघासाठी १३ अशा ८६ उमेदवारांनी मुलाखती दिल्या.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे लोकप्रतिनिधी, उमेदवार पक्षांतर करीत असताना यवतमाळ जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल ८६ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यामध्ये जिल्ह्यातील माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे, माजी आमदार वामनराव कासावर, माजी आमदार विजय खडसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या सव्वालाखे या जेष्ठ नेत्यासोबतच दुसऱ्या फळीतील बाळासाहेब माणगुळकर, प्रवीण देशमुख, संजय ठाकरे, बाबासाहेब गाडेपाटील, देवानंद पवार, अरुण राऊत, सिकंदर शहा यांच्यासह इतर इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत.

Intro:काँग्रेसकडून सात मतदार संघासाठी इच्छुक 86 उमेदवारांच्या मुलाखतीBody:यवतमाळ : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघासाठी काँग्रेस पक्षांकडून जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात इच्छुक 86 उमेदवारांनच्या मुलाखती घेण्यात आल्या.
मुलाखती घेण्याकरिता
दिवसभर चाललेल्या या मुलाखतीसाठी जिल्हा परिषदेचे माझी अध्यक्ष नाना गावंडे (नागपूर)
माजी आमदार बबनराव तायवाडे, श्यामबाबु उमाळकर निरिक्षक, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी इच्छुक उमेदवारांनच्या मुलाखती घेतल्या.
वणी विधानसभेसाठी 18, राळेगाव विधानसभेसाठी 13, यवतमाळ विधानसभेसाठी 17 उमेदवार, दारव्हा दिग्रस विधानसभेसाठी 8, आर्णी केळापुर विधानसभेसाठी 8 उमेदवारानि, पुसद विधानसभेसाठी 9 तर
उमरखेड विधानसभा संघासाठी 13 अश्या 86 उमेदवारांनी मुलाखती दिल्या.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे लोकप्रतिनिधी, उमेदवार पक्षांतर करीत असताना यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी तबल 86 इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या. यामध्ये जिल्ह्यातील माजीमंत्री प्रा. वसंत पुरके, माजीमंत्री ऍड. शिवाजीराव मोघे, माजी आमदार वामनराव कासावर, माजी आमदार विजय खडसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या सव्वालाखे या जेष्ठ नेत्यासोबतच दुसऱ्या फळीतील बाळासाहेब माणगुळकर, प्रवीण देशमुख, संजय ठाकरे, बाबासाहेब गाडेपाटील, देवानंद पवार, अरुण राऊत, सिकंदर शहा यांच्यासह इतर इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहे.
Conclusion:
Last Updated : Aug 2, 2019, 5:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.