यवतमाळ - विलगीकरणासाठी शहरातील अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहात १९७ बेडची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, वसतिगृहात विलगीकरण करण्यात आलेले ४० डॉक्टर्स, नर्स, रुग्णालयातील कर्मचारी, तबलिगीतील कोरोना संशयित यांच्यासाठी एकच संडास, बाथरूमची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे, सोशल डिस्टंन्सिंगचे तीन तेरा झाले आहेत, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका डॉक्टरने दिली.
जिल्ह्यात ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. या रुग्णांना अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. मात्र, संडास बाथरूम आणि इतर आवश्यक सोयीसुविधा नसल्याने विलगीकरणातील ४० डॉक्टरांनी त्यांना इतरत्र हलविण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा- चंद्रपुरात तस्करांना उत; सलग तिसऱ्या दिवशी केलेल्या कारवाईत अडीच लाखांची दारू जप्त