यवतमाळ - दहा वर्षांपूर्वी मारेगाव तालुक्यातील जळका या गावातील कलावती बांदूरकर या शेतकरी आत्महत्याग्रस्त महिलेच्या घरी राहुल गांधी यांनी भेट दिली होती. तेव्हापासून कलावती बांदूरकर या प्रकाश झोतात आल्या होत्या. मोदी सरकार हे सामान्य जनतेची लूट करत असल्याची बांदूरकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त दिली आहे. त्या मंगळवारी वणी येथील राहुल गांधी यांच्या सभेला आल्या होत्या.
हेही वाचा - शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही, आदित्य ठाकरेंचा भाजपला घरचा आहेर
मंळवारी काँग्रेसच्या प्रचारासाठी खासदार राहुल गांधी यांची वणी सभा होणार आहे. कलावती या सभेला आल्या होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, भाजप सरकारने जनधन योजनेतून प्रत्येकाचे खाते काढले आणि याच पैशातून गॅस सिलेंडरचे वाटप केले. तसेच स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्यात कपात या मोदी सरकारने केली. बेरोजगारी वाढत चालली आहे, त्यामुळे काँग्रेस सत्तेवर यायला पाहिजे, असही कलावती यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
हेही ेवाचा - मनसेचा उमेदवार 'चंपा'ची चंपी करणार - राज ठाकरे