ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यात एकाच दिवशी १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यु; तर २४७ जण पॉझेटिव्ह

सद्यस्थितीत जिल्ह्यात १९६५ सक्रिय रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २४८४० इतकी झाली आहे. २४ तासांत ३०५ जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या २२३०२ एवढी आहे.

यवतमाळ कोरोना
यवतमाळ कोरोना
author img

By

Published : Mar 22, 2021, 11:02 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात मागील चार दिवसापासून कोरोनामुळे मृत्यूचा आकडा वाढतच चालला आहे. काल १४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सोमवार (आज) पुन्हा जिल्ह्यात १३ जणांचा मृत्यु झाला आहे. तर
२४७ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या ३०५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

२४६६ अहवाल प्राप्त
मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील ६९ , ६७, ८७, ३६ वर्षीय पुरुष, यवतमाळ तालुक्यातील १८ वर्षीय पुरुष आणि ७८ वर्षीय महिला, दिग्रस येथील ७५ वर्षीय पुरुष, दारव्हा येथील ७८ वर्षीय पुरुष आणि ६३ वर्षीय महिला, दारव्हा तालुक्यातील ७० वर्षीय पुरुष, बाभुळगाव तालुक्यातील ५२ वर्षीय पुरुष आणि ५६ वर्षीय महिला, उमरखेड तालुक्यातील ८४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. सोमवारी एकूण २४६६ अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी २४७ जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर २२१९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.

१९६५ सक्रिय रुग्ण
सद्यस्थितीत जिल्ह्यात १९६५ सक्रिय रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या २४८४० इतकी झाली आहे. २४ तासात ३०५ जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या २२३०२ एवढी आहे.

हेही वाचा-विदारक : संशयित कोरोना रुग्णांची तीन तासांहून अधिक लॅबसमोर अहवालाकरता प्रतीक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.