यवतमाळ - केंद्र सरकारच्या खिचडी पद्धती (मिक्सपॅथी) धोरणाला कडाडून विरोध करीत आज आयएमए व आयडीएच्यावतीने सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत रुग्णालय बंद आंदोलन पुकारले आहे. असे असले तरी केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे आयएमए जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव जोशी यांनी सांगितले.
आयुर्वेद विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी देण्याच्या केंद्रीय सरकारच्या राजपत्रातील सीसीआयएमच्या अधिसूचनेविरोधात आयएमएने राष्ट्रीय पातळीवर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील 219 शाखांमधील 45 हजार डॉक्टरांसह महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी असलेले एकूण 1 लाख 10 हजार डॉक्टर सहभागी झाले आहे.
![डॉक्टरांचे आंदोलन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ytl-01-ima-doctor-andolan-vis-byte-720445_11122020134649_1112f_1607674609_722.jpg)
हेही वाचा-आयएमएच्या संपाचा निमाकडून निषेध; गुलाबी फीत लावून लावून जादावेळ काम करणार डॉक्टर
लढा आयुर्वेदविरोधी नसून मिक्सपॅथी विरोधातकेंद्रसरकार व आयुष मंत्रालयप्रणीत सीसीआयएमच्या अधिसूचनेत बीएएमएस झालेल्या आयुर्वेद विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणात 58 अॅलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. अॅलोपॅथिक डॉक्टरांकडून की सीसीआयएमचा कोर्स केलेल्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत, हे न समजल्यामुळे रुग्णांना गोंधळात पडण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे आयएमएचा लढा आयुर्वेदविरोधी नाही तर, मिक्सपॅथी विरोधात असल्याचे अध्यक्ष डॉ. संजीव जोशी व सचिव डॉ. प्रशांत कसारे यांनी स्पष्ट केले आहे.हेही वाचा-आयुष डॉक्टरांच्या विरोधात एमबीबीएस डॉक्टर; 'आयुष'ने थोपटले आयएमएविरोधात दंड
काय आहे डॉक्टरांच्या संघटनेतील वाद?
भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने शल्य व शालाक्य विषयाच्या पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याचे स्वागत आयुषच्या सर्व संघटनांनी केले आहे. या माध्यमातून तीन वर्षांचे पदव्युत्तर घेतल्यानंतर विविध शस्त्रक्रियांच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या आयुष डॉक्टरांना कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे. मात्र, यावर इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्षेप घेतला. या कायद्याला स्थगिती देण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने यावर स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला. सर्वोच्च न्यायालयानेदेखील यावरची याचिका फेटाळून लावली.