ETV Bharat / state

यवतमाळ विधान परिषद पोट निवडणुकीसाठी 100 टक्के मतदान, निकालाकडे सर्वांचे लक्ष - legislative council by election

2016 मध्ये येथून शिवसेनेचे तानाजी सावंत जिंकून आले होते. मात्र, आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत हे भूम परंडा मतदारसंघातून जिंकून आल्याने यवतमाळला विधान परिषद पोट निवडणूक झाली.

yavatmal
यवतमाळ विधान परिषद पोट निवडणुकीसाठी 100 टक्के मतदान, नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
author img

By

Published : Feb 1, 2020, 8:28 AM IST

यवतमाळ - स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद पोट निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत 100 टक्के मतदान झाले. आता उमेद्वारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून 4 फेब्रुवारीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यवतमाळ विधान परिषद पोट निवडणुकीसाठी 100 टक्के मतदान

हेही वाचा - मतदान केंद्रावर मतदारांची तपासणी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आतमध्ये नेण्यास मनाई

निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. महाविकास आघाडीकडून दुष्यंत चतुर्वेदी, तर भाजपकडून सुमित बाजोरिया यांच्यात थेट लढत झाली. जिल्ह्याच्या वणी, राळेगाव, केळापूर, यवतमाळ, दारव्हा, पुसद आणि उमरखेड या सात मतदान केंद्रावर 489 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आता कोणाचा विजय होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा - यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; मतदारांची पसंती आघाडी, की भाजपला?

या निवडणुकीत मतविभाजन होऊ नये म्हणून मतदारांना महाविकास आघाडी आणि भाजपकडून बाहेरगावी पाठवण्यात आले होते. आज याच मतदारांनी विशेष गाडीतून सकाळी मतदान केंद्रावर दाखल होत मतदान केले. 2016 मध्ये येथून शिवसेनेचे तानाजी सावंत जिंकून आले होते. मात्र, आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत हे भूम परंडा मतदारसंघातून जिंकून आल्याने यवतमाळला विधान परिषद पोट निवडणूक झाली.

हेही वाचा - यवतमाळ विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण

या निवडणुकीची 4 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असून मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीचा कार्यकाळ हा डिसेंबर 2022 पर्यंत राहणार आहे. दारव्हा मतदान केंद्रावर 44 मतदान, यवतमाळ केंद्रावर 180, पुसद मतदान केंद्रावर 57, राळेगाव मतदान केंद्र 37, उमरखेड मतदान केंद्र 62, केळापूर मतदान केंद्र 60, वणी येथील मतदान केंद्रावर 49 असे एकूण 489 म्हणजे 100 टक्के मतदान झाले.

Intro:Body:यवतमाळ: यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद पोट निवडणुक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत 100 टक्के मतदान झाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून आता 4 फेब्रुवारीच्या
निकालाकडे सर्वांच्या नजर राहणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून दुष्यंत चतुर्वेदी तर भाजप कडून सुमित बाजोरिया यांच्यात थेट लढत झाली. जिल्ह्याच्या वणी, राळेगावं, केळापूर, यवतमाळ, दारव्हा ,पुसद आणि उमरखेड या सात मतदान केंद्रावर 489 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून आपल्या पसंतीच्या उमेदवार मतदान केले. आता निवडणूक निकाल नंतर कोण जिंकून येणार याची सर्वाना उत्सुकता लागली आहे.

या निवडणुकीत मतविभाजन होवू नये म्हणून मतदारांना महाविकास आघाडी आणि भाजप कडून एकत्र ठेवण्याच्या रणनीतीतुन बाहेरगावी घेऊन जाण्यात आले होते. आज हेच मतदार विशिष्ट गाडीतून सकाळी आपापल्या मतदान केंद्रावर दाखल होऊन सर्वानी मतदान केले.

2016 मध्ये येथून शिवसेनाचे तानाजी सावंत जिंकून आले होते. मात्र आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत हे भूम परंडा मतदारसंघातुन जिंकून आल्याने यवतमाळला विधान परिषद पोट निवडणूक झाली. 4 फेब्रुवारी ला मतमोजणी असून मतदार कुणाच्या बाजूने कौल दिला हे निकाल नंतर स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीचा कार्यकाळ हा डिसेंबर 2022 पर्यंत राहनार आहे.

दारव्हा मतदान केंद्रावर 44 मतदान, यवतमाळ केंद्रावर 180, पुसद मतदान केंद्रावर 57, राळेगाव मतदान केंद्र 37, उमरखेड मतदान केंद्र 62, केळापूर मतदान केंद्र 60, वणी येथील मतदान केंद्रावर 49 असे एकूण 489 म्हणजे 100 टक्के मतदान झाले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.