ETV Bharat / state

यवतमाळामध्ये दहा वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद, पारा ४४.५ अंश सेल्सिअसवर - metrology depatment

हवामान खात्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. उन्हाच्या वाढत्या झळांनी शहरातील रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट दिसून येत आहे.

यवतमाळामध्ये दहा वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद, पारा ४४.५ अंश सेल्सिअसवर
author img

By

Published : Apr 26, 2019, 12:08 PM IST

यवतमाळ - विदर्भात सध्या उन्हाच्या तडाक्यामुळे तापमानाचा पारा वाढत चालला आहे. गुरूवारी (२६ एप्रिल) जिल्ह्यात सर्वाधिक ४४.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. या नोंदीने एप्रिल महिन्यातील गत १० वर्षामधील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

हवामान खात्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. उन्हाच्या वाढत्या झळांनी शहरातील रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट दिसून येत आहे.

यवतमाळामध्ये दहा वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद, पारा ४४.५ अंश सेल्सिअसवर
आजवर जिल्ह्यात एप्रिलचे उच्चांकी तापमान ४० ते ४१ अंशाच्या आसपासच राहिले आहे. यावर्षी हे तापमान ४४.५ अंशापर्यंत चढले. उष्णतेची लाट असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून सर्व आरोग्य यंत्रणांना खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्राथमिक उपचार केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालयात यासंदर्भात उष्माघाताच्या आजारावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वतंत्र कक्ष उघडण्याच्याही सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

या अचानक वाढलेल्या तापमानामुळे काल राज्य परिवहन मंडळाच्या बसणे पेट घेतल्याची घटना जोडमोहा गावाजवळ घडली. तर, यवतमाळ शहरातील तलाव फैल भागांमधील एका डीपीने पेट घेतला. येथील वायरिंग जळून खाक झाल्यामुळे जवळपास ६ ते ७ तास वीजपुरवठा खंडित झाला होता.

Intro:जिल्ह्यात गत दहा वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद; पारा 44.5 अंश सेल्सिअसवर
Body:यवतमाळ : गुरूवारी जिल्ह्यात सर्वाधिक ४४.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. या नोंदीने एप्रिल महिन्यातील गत १० वर्षामधील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे.
हवामान खात्याने विदर्भात उष्णतेची लाटेचा अंदाज वर्तविला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. उन्हाच्या वाढत्या झळांनी शहरातील रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट दिसूून येेत आहे.
आजवर जिल्ह्यात एप्रिलचे उच्चांकी तापमान 40 ते 41अंशाच्या आसपासच राहिले आहे. यावर्षी हे तापमान 44.5 अंशापर्यंत चढले. उष्णतेची लाट असल्याचामुळे जिल्हा प्रशासनाकडून सर्व आरोग्य यंत्रणांना खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच प्राथमिक उपचार केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालयात यासंदर्भात उष्माघाताच्या आजारावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वतंत्र कक्ष उघडण्याची ही सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
या अचानक वाढलेल्या तापमानामुळे काल राज्य परिवहन मंडळाच्या बसणे पेट घेतल्याची घटना जोडमोहा गावाजवळ घडली. तर यवतमाळ शहरातील तलाव फैल भागांमधील एका डीपीने पेट घेतला. येथील वायरिंग जळून खाक झाली असून जवळपास सहा ते सात तास वीजपुरवठा खंडित झाला होता.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.