ETV Bharat / state

#MAHARASHTRARAIN : उमरखेड, पुसद, महागाव तालुक्यात पावसाचा धुमाकूळ

author img

By

Published : Jul 22, 2021, 8:20 PM IST

महाराष्ट्रात सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला आहे. यवतमाळ जिल्ह्यातही पाऊस धो-धो बरसत आहे. अनेक भागात पूर सदृश परस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार पावसामुळे उमरखेड-पुसद मार्ग बंद झाला आहे. उमरखेड-दहागाव नाल्याला मोठा पूर आला आहे.

yavatmal
yavatmal

यवतमाळ - उमरखेड, पुसद, दिग्रस आणि महागाव तालुक्यात पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. अनेक भागात पूर सदृश परस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार पावसामुळे उमरखेड-पुसद मार्ग बंद झाला आहे. उमरखेड-दहागाव नाल्याला मोठा पूर आला आहे. कुपटी येथील विजय येलुतवाड हा तरुण दहागाव नाल्यात वाहून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्या अनुषंगाने तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी तत्काळ शोध मोहीम सुरु केली. दैव बलवत्तर असल्याने विजय येलुतवाड बचावला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातही पासवाचा धुमाकूळ

साडेसातशे हेक्टरवरील पिके पाण्यात

पिकं पाण्यात
पिकं पाण्यात

उमरखेड तालुक्यातील जेवली ते सहस्त्रकुंड मार्गावरील नाल्याला पूर आल्याने वाहतूक बंद झाली होती. तर ढानकी जवळील सावळेश्वर या गावात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यात उमरखेड तालुक्यातील 34 घरांची पडझड झाली. तर 750 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतात पाणी साचल्याने पिकांना फटका बसला आहे. जोरदार आलेल्या पावसाने उमरखेड तालुक्यात अनेक ओढ्यांना पूर आला. त्यामुळे पुलावरून पाणी वाहिल्याने ओढ्याच्या पुलावरुन कोणीही वाहतूक किंवा ये-जा करू नये, असे आवाहन उमरखेडचे तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी केले आहे.

नदी-नाल्यांना पूर

पुसद आणि उमरखेड तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळल्याने नदी-नाल्यांना पूर आला. पुसदच्या ब्राम्हणगाव (शामपूर) भागात रात्री आणि आज पहाटे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे येथे असलेल्या नाल्याला पूर आला. त्याच नाल्या शेजारील काही घरात पाणी शिरले. काही शेतातही पाणी शिरले. या दोन गावांच्या मधोमध असलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे. शिवाय जिल्ह्याच्या उमरखेड-पुसद रोडवरील दहागाव जवळील नाला ओसंडून वाहत आहे. रात्री उमरखेड तालुक्यात सुद्धा जोरदार पाऊस असल्याने नाल्यांना पूर आला. त्यामुळे नाल्यांना पूर असताना नागरिकांनी येथून जाऊ नये, असे आवाहन तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी केले.

पूस धरण 92 टक्के भरले

ब्राम्हणगाव येथील तरुण मंडळींनी बचावकार्य करत गावकऱ्यांची मदत केली. उमरखेड तालुक्यात 86.9 मिलिमीटर, महागाव तालुक्यात 84.1 मिलिमीटर, पुसद तालुक्यात 74.3 मिलिमीटर तर दिग्रस तालुक्यात 74.3 मिलिमीटर पाऊस पडला. पुसद येथील पूस धरण 92 टक्के भरले आहे. बाभूळगाव तालुक्यातील बेंबला प्रकल्पाचे दोन दरवाजे 10 सेंटीमीटरने उघडले आहेत.

हेही वाचा - रत्नागिरी, कोल्हापूर पाण्याखाली : पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल; NDRF पथक रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.