ETV Bharat / state

यवतमाळमध्ये वर्षभरात 1 कोटींपेक्षा अधिक किंमतीचा गुटखा जप्त; 237 जणांवर कारवाई

जिल्ह्यातील वडकी येथे 61 लाख 55 हजारांचा गुटखा, नेर येथे 31 लाखांचा गांजा, पुसद येथे 38 लाखांचा गुटखा या तीन मोठ्या कारवाई मागील आठ दिवसात करण्यात आले.

भुजबळ
भुजबळ
author img

By

Published : Aug 24, 2021, 3:09 AM IST

Updated : Aug 24, 2021, 3:15 AM IST

यवतमाळ - जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर अटकाव आनण्यासाठी विविध कारवाई करण्यात आले. मागील वर्षभरात गुटखाच्या 89 केसेस पुढे आले आहेत. यात 237 जणांवर कारवाई करण्यात आली आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. शिवाय या कारवाईत 1 कोटी 71 लाखांचा प्रतिबंधित गुटका जप्त करण्यात आला आहे, अशी माहितीही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी दिली आहे.

यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक

डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम गुटका मुक्ती अभियान

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांच्या संकल्पनेतून डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम गुटका मुक्ती अभियान राबविले जात आहे. याची सुरुवात पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते करण्यात आली आणि याच अनुषंगाने जिल्ह्यात अवैद्य गुटखा कारवाई करण्याचा वेग आला आहे. जिल्ह्यातील वडकी येथे 61 लाख 55 हजारांचा गुटखा, नेर येथे 31 लाखांचा गांजा, पुसद येथे 38 लाखांचा गुटखा या तीन मोठ्या कारवाई मागील आठ दिवसात करण्यात आले. तर पुसद, नेर, राळेगाव, आर्णी, फुलसावंगी अशा विविध ठिकाणी कारवाई करत 1 कोटी 71 लाखांचा प्रतिबंधित गुटखा व गांजा जिल्हा पोलीस दलाकडून जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी दिली आहे.

हेही वाचा - जादूटोणा संशय प्रकरण : शरीरावरील जखमा तर भरतील, पण मानसिक आघाताचे काय?

Last Updated : Aug 24, 2021, 3:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.