ETV Bharat / state

एकाच मतपत्रिकेवर सरपंच, उपसरपंचाच्या निवडीनंतर ग्रामपंचायत सदस्यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार - yavatmal political news

ही निवडप्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारीतून केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी एन. आर. भोंगाडे यांनी सर्व सदस्यांना हात वर करून सरपंच निवडीची प्रक्रिया समजावून सांगितली.

Breaking News
author img

By

Published : Mar 3, 2021, 8:26 PM IST

Updated : Mar 3, 2021, 8:38 PM IST

यवतमाळ - बाभूळगाव तालुक्यातील सावर येथे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडप्रक्रियेत एकाच मतपत्रिकेवर निवडणूक घेत निवडणूक अधिकारी यांनी घोळ घातला. त्यामुळे ही निवडप्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारीतून केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी एन. आर. भोंगाडे यांनी सर्व सदस्यांना हात वर करून सरपंच निवडीची प्रक्रिया समजावून सांगितली.

दोन्ही पदाची निवडणूक एकाच मतपत्रिकेवर

गुप्त मतदानासाठी कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन न घेता सदस्यांना सरंपच व उपसरपंचपदाच्या उमेदवारासाठी निश्‍चित केलेल्या अर्जाची प्रत सोपविण्यात आली. एकाच बॅलेट पेपरवर ही निवडणूक घेण्यात आली. सरपंचपदी मंदा गुल्हाने तर उपसरपंचपदी मोहम्मद इलियास यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी भोंगाडे यांनी त्यांच्या प्रोसिडिंगमध्ये प्रथम सरपंच व नंतर उपसरपंचपदाची निवडणूक घेतल्याची नोंद घेतती. प्रत्यक्षात मात्र, दोन्ही पदाची निवडणूक एकाच मतपत्रिकेवर घेतली. नियमबाह्य झालेली ही निवड प्रक्रिया रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्य नितीन राठी, वैशाली पसोडे, मंगला शिवणकर, मीरा शेंडे, सुनील क्षीरसागर, सविता गौरकार यांनी केली आहे.

Last Updated : Mar 3, 2021, 8:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.