ETV Bharat / state

यवतमाळमध्ये चोरीचे प्रकार सुरूच; बनावट चावी वापरून चोरट्यांनी लांबविला सहा लाखांचा मुद्देमाल - चोरी यवतमाळ बातमी

सय्यद इश्ताक अली यांचे सर्व कुटुंबीय कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी बनावट चावीचा वापर करून घर उघडून कपाटातून रोख सहा लाख व सोने लंपास केले.

gold-robbery-at-yavatmal
यवतमाळमध्ये चोरीचे प्रकार सुरूच
author img

By

Published : Dec 9, 2019, 12:07 PM IST

यवतमाळ- शहरातील चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही. चोरट्यांनी सहा लाखांच्या रोख रक्कमेसह चार ग्रॅम सोने लांबविल्याची घटना पांढरकवडा रोडवरील जफरनगर येथे घडली. सय्यद इश्ताक अली (वय 32) यांच्याकडे ही चोरी झाली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

यवतमाळमध्ये चोरीचे प्रकार सुरूच

हेही वाचा- धक्कादायक..! महापालिका एका झाडावर करणार 59 हजाराचा खर्च

सय्यद इश्ताक अली यांचे सर्व कुटुंबीय कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी बनावट चावीचा वापर करून घर उघडून कपाटातून रोख सहा लाख व सोने लंपास केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह अवधुतवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याच आठवड्यात सत्यनारायण ले-आऊटमधील सेवानिवृत्त मुख्याध्यापक गणेश जाधव यांच्या घरी चोरी करून चोरट्यांनी 270 ग्राम सोने व 80 हजार रुपयांची चोरी केली होती. आता पुन्हा धाडसी चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Intro:Body:यवतमाळ : शहरातील चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही. चोरट्यांनी सहा लाखांच्या रोख रक्कमेसह चार ग्रॅम सोने लांबविल्याची पांढरकवडा रोडवरील जफरनगरात घडली.

सय्यद इश्ताक अली (32) याच्याकडे ही चोरी झाली. सर्व कुटुंबीय कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. परत आले असता, घराचे कुलूप उघडे दिसले. त्यांनी आतप्रवेश करून बघीतले असता, कपाटातून रोख सहा लाख व सोने लंपास केल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडले नाही. त्यामुळे चोरट्यांनी चोरी करताना बनावट चाबीचा वापर केल्याचे अली यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. याच आठवड्यात सत्यनारायण ले-आऊटमधील सेवानिवृत्त मुख्याध्यापक गणेश जाधव यांच्या घरी चोरी करून चोरट्यांनी 270 ग्राम सोने व 80 हजार रुपये रोखअसा मुद्देमाल उडविला होता. आता पुन्हा धाडसी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. वारंवार चोरीच्या घटना घडत असताना पोलीस काय करीत आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.