ETV Bharat / state

कुख्यात गुंडाची भरदिवसा चाकूने सपासप वार करुन हत्या

author img

By

Published : Aug 26, 2020, 8:50 PM IST

कुख्यात गुंड देविदास निरंजन चव्हाण याची चाकूने सपासप वार करून भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास लोहारा परिसरात घडली.

Gangster Devidas Chavan murder in yavatmal
कुख्यात गुंडाची भरदिवसा चाकूने सपासप वार करुन हत्या

यवतमाळ - लोहारा परिसरात मागील काही वर्षांपासून दोन गटात टोळीयुद्ध सुरू आहे. या टोळी युद्धातून कुख्यात गुंड देविदास निरंजन चव्हाण याची चाकूने सपासप वार करून भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत देविदास चव्हाण हा महिन्याभरापूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता. त्याच्यावर भैय्या यादव नामक युवकावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप होता. आज सकाळी देविदास चव्हाण हा दुचाकीने लोहारा परिसरातून जात होता. तेव्हा आधीच देविदासच्या मार्गावर लपून बसलेल्या मारेकऱ्यांनी मारुती शोरूम समोर देविदास याला अडवले व त्याच्या गळ्यावर धारधार चाकूने वार केले. यात देविदास याचा जागीच मृत्यू झाला.

विशेष म्हणजे, भैया यादव याच्यावर ज्या जागेवर प्राणघातक हल्ला झाला होता. त्याच जागेवर देविदास चव्हाण याचा आज भरदिवसा खून करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर या घटनास्थळी दाखल झाल्या. पण खून करून आरोपी पसार झाले होते. पोलीस सद्या आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा - यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

हेही वाचा - चार वर्षाच्या मुलाला कीटकनाशन पाजून मातेची आत्महत्या, यवतमाळमधील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.