यवतमाळ : भोयर शिवारात मोचन धाब्याजवळ झालेल्या हत्याकांडामधील ( Gajanan Rathod murder mystery Yavatmal ) अनोळखी मृताची शनिवारी ओळख पटली. त्यानंतर आज खूनाचे रहस्यही उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान पोलिसांनी घटनेतील मारेकर्याला अटक केली ( accused arrested of Gajana Rathod murder case ) असून मृतकाच्या त्रासाला वैतागूनच हत्या केल्याची कबुली मारेकर्याने दिली आहे. सुरेश सोनबाजी बोरकर (वय 42 वर्षे, रा. चापडोह यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर गजानन मारुती राठोर (वय 44 वर्षे, रा. जवळा) असे मृतकाचे नाव आहे. 31 ऑगस्ट रोजी सकाळी भोयर शिवारामध्ये एका अनोळखी इसमाची तीक्ष्ण हत्यार व दगडाने ठेचून निघृण हत्या करण्यात आली होती.
म्हणून गजाननचा केला गेम ओव्हर - 30 ऑगस्टच्या मध्यरात्री जवळा बसस्थानक परिसरातील पोलिस चौकीवर गजानन हा मद्य प्राशन करून होता. तेव्हा लोणी येथून यवतमाळ कडे आरोपी सुरेश येत होता. यावेळी गजाननने सुरेशची दुचाकी अडविली. व त्याच्या सोबत झटापट करू लागला. त्यानंतर तो जबरदस्तीने दुचाकीवर बसला. यावेळी जवळा येथिल पुलापर्यंत दोघेही आले. तेथे गजाननने दुचाकीस्वाराला मारहाण केली व पुन्हा दुचाकीवर बसला. गजाननच्या त्रासाला त्रस्त झालेल्या सुरेशने गजाननला यवतमाळ भोयर बायपासवर आणले. येथे गजाननने पुन्हा वाद केला. व आता राग अनावर झाल्याने त्याने सूरेशने मोचन ढाब्याजवळ गजाननच्या चेहऱ्यावर कटरने वार केले व डोक्यात दगड घालून ठार केले. त्यानंतर तो तेथून निघून गेला.
गुरख्याने बजावली सुजाण नागरिकाची भूमिका - या घटनेला महत्त्वाचा धागा साक्षीदार गुरखा लक्ष्मण नरसिंग थापा रा. जवळा हा आहे. लक्ष्मण थापा ने सजग व सुजाण नागरिकांची भूमिका पार पाडली. घटनेच्या वेळी थापा यांनी मृतक, आरोपी व दुचाकीचा मोबाईलमध्ये काढलेला फोटोमुळे या गुन्हयाचा छडा लावण्यामध्ये पोलिसांना मोलाची मदत झाली आहे. सदर साक्षीदार गोरखा नामे लक्ष्मण नरसिंग थापा य. ग्राम जवळा याच्या उल्लेखनीय योगदानाबददल पोलिस विभागातर्फे त्यास प्रशंसापत्र 5 हजार रोख प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.