यवतमाळ - मारेगाव शहरातून गेलेल्या चौपदरी महामार्गावर मोकाट जनावराचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष करत आहे.
मोकाट जनावरे दिवस-रात्र मारेगाव बसथांबा ते जिजाऊ चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौका दरम्यान ऐन महामार्गाच्या मध्यभागी ठाण मांडून बसतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. मारेगाव नगरपंचायत दुर्लक्ष करीत असले तरी या जनारांच्या मालकांना देखील जनावरांची काळजी नसल्याचे दिसून येते. महामार्गावर बसलेल्या जनावरांची चोरी होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे त्यांच्या मालकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच वाहतूक पोलिसांनी देखील मोकाट जनारांचा बंदोबस्त करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.