यवतमाळ - बाभूळगाव तालुक्यातील महंमदपूर येथे शॉर्टसर्किटमुळे चार एकरातील ऊस जळून खाक झाला. यात शेतकऱ्याचे तीन लाखांचे नुकसान झाले. रुपेश सोपानराव ठाकरे असे शेतकऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा - अंधेरी एमआयडीसीतील इमारतीला पुन्हा लागली आग, जीवितहानी नाही
बाभूळगाव तालुक्यातील महंमदपूर येथील शेतकरी रुपेश सोपानराव ठाकरे यांच्या चार एकर शेतातील ऊस काढणीला आला होता. शेतातून वीजवितरण कंपनीच्या तारा गेल्या आहे. विद्यूत प्रवाहित तारेच्या घर्षणामुळे ठिणग्या पडून उसाच्या फडाला आग लागली. ही बाब लक्षात येईपर्यंत ऊस जळून खाक झाला होता. गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी नापिकीचा सामना करीत आहे. नापिकीमुळे झालेले कर्ज फेड करता येईल, या उद्देशाने ऊस लागवड केली होती. आता ऊस तोडणीला आला होता. साखर कारखाना प्रशासनाने हा ऊस तोडून नेला नाही. परिणामी शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.