यवतमाळ - आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण 9 झाली आहे. ही व्यक्ती हा एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य असून तो 9 एप्रिलपासून आयसोलेशन वॉर्डात भरती आहे.
तपासणीसाठी त्याचे पहिले नमुने 9 एप्रिलला पाठविण्यात आले होते. तेव्हा त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर 19 एप्रिलला परत नमुने पाठविले असता, या व्यक्तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. पॉझिटिव्ह नागरिकांच्या संपर्कात आलेल्यांनी आपल्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वत: समोर येऊन प्रशासनाला माहिती द्यावी. त्यानंतर आपली वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या सर्वच पॉझिटिव्ह रुग्णावर जिल्हा वैद्यकीय रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात उपचार सूरू आहेत.