यवतमाळ - बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यामुळे शिवसेना आणि भाजपची पवित्र युती झाली होती. ही वैचारिक युती होती. आता उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर केलेली आघाडी अपवित्र आहे, असा हल्लाबोल माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केला.
यवतमाळ येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे विचार कुठेही जुळत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावातच राष्ट्रवाद आहे. पण, राष्ट्रवाद कुठेही दिसत नाही. केवळ सत्तेसाठी तिघेही एकत्र आले आहेत. त्यांचे विचार, कार्यक्रम कुठेही जुळत नाहीत.
भाजप, शिवसेना यांनी राममंदिर, हिंदुत्व हा मुद्दा घेऊन लढा दिला. बाळासाहेब ठाकरे आम्हाला पूज्यनिय आहेत. उद्धव ठाकरे हे त्यांचे पुत्र, विचारांचे वारसदार ठरतात. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली घुसखोरी आपण स्वतः बघितली आहे. भगवे कपडे घालून घेतलेली शपथ काँग्रेस नेत्यांना बघवली नाही. त्यामुळे ही महाविकास आघाडी खूप दिवस टिकणार नाही, असा दावा माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केला.
हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यवतमाळमधून निवडणूक लढण्याची ऑफर