ETV Bharat / state

वनमंत्री संजय राठोड यांनी दिले 'त्या' वाघाला पकडण्याचे आदेश - टिपेश्वर अभयारण्य लेटेस्ट न्यूज

कोपामांडवी, अंधारवाडी, टेंभी व पाटणबोरी येथील गावकरी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांची वनमंत्री संजय राठोड यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी, यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक रामाराव, उपवनसंरक्षक केशव वाबळे, पांढरकवडाचे उपवनसंरक्षक सुभाष दुमारे, विभागीय वनअधिकारी संदीप चव्हाण यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

Forest Minister Sanjay Rathore
वनमंत्री संजय राठोड
author img

By

Published : Sep 6, 2020, 4:19 PM IST

यवतमाळ - केळापूर तालुक्यात टिपेश्वर अभयारण्यालगत असलेल्या गावात वाघाने धुमाकूळ घातला आहे. या वाघाच्या हल्ल्यात गावकरी जखमी होत असून अनेक जनावरांची शिकारही होत आहे. त्यामुळे या नरभक्षक वाघाला तत्काळ जेरबंद करण्याचे आदेश वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

कोपामांडवी, अंधारवाडी, टेंभी व पाटणबोरी येथील गावकरी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांची वनमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी, यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक रामाराव, उपवनसंरक्षक केशव वाबळे, पांढरकवडाचे उपवनसंरक्षक सुभाष दुमारे, विभागीय वनअधिकारी संदीप चव्हाण यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी 20 जणांच्या टीमने दिवसरात्र पेट्रोलिंग करावे. लोकांच्या संपर्कात राहून त्यांना धीर द्यावा. या वाघाला पकडण्यासाठी रॅपिड रेस्क्यू टीम आणि विशेष व्याघ्र संरक्षण दल वाहनांसह तैनात करावे. टिपेश्वर अभयारण्यालगत असणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी मागणी केल्यास त्यांना 75 टक्के अनुदानावर सोलर फेन्सिगचा लाभ द्यावा. अभयारण्यालगत तारेचे कुंपण घालावे, जेणेकरून वन्यप्राणी नागरी वस्त्यांमध्ये येणार नाही. वन्यप्राण्यांकडून होणारी नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यांना तत्काळ उपलब्ध करून द्यावी, असे आदेश वनमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी वाघाच्या हल्ल्यात पशुधनाचे नुकसान झालेल्या गावकऱ्यांना वनमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते एकूण दोन लाख रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले. सुकळी येथील रामबाई आत्राम (30 हजार रुपये), टेंभी येथील सागर रामगिरवार (30 हजार), गजानन शेंडे (21 हजार), संतोष सैपटवार (18 हजार 750), सुन्ना येथील अरुण जिड्डेवार (19 हजार 500), विजय एबंडवार (18 हजार 750), टेंभी येथील यादव बडवाईकर (16 हजार 500), अंधारवाडी येथील लिंगा मेश्राम (15 हजार), इंद्रदेव कुमरे (7 हजार 500), कोब्बई येथील मोरेश्वर कुमरे (11 हजार 250 ), टेंभी येथील पंचफुला सोयाम (11 हजार 250) यांचा मदत मिळणाऱ्यामध्ये समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.