ETV Bharat / state

गर्भवती वाघीण शिकार प्रकरणातील पाच आरोपींना अटक; एकूण ८ जण जेरबंद - वाघिणीची शिकार ५ जणांना अटक

मांगुर्ला जवळ वन क्रमांक 30 मध्ये 25 एप्रिल रोजी एका नाल्याच्या जवळील गुहेत एक वाघिण मृत अवस्थेत असल्याचे उघडकीस आले होते. वाघिणीच्या गळ्यात फास लावल्याचे आढळून आले होते. तसेच तिच्या शरीरावर हत्याराने वार केल्याचे आढळून आले होते. वाघिणीच्या पुढच्या पायाचे दोन्ही पंजे गायब होते. त्यामुळे शिकारीच्या उद्देशाने तिची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर वनविभागाच्या दुभाटी येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.

वाघीण शिकार प्रकरणातील पाच आरोपींना अटक
वाघीण शिकार प्रकरणातील पाच आरोपींना अटक
author img

By

Published : Jun 20, 2021, 12:45 PM IST

यवतमाळ - झरी तालुक्यातील मांगुर्ला जंगल परिसरात गर्भवती वाघिणीची शिकार करण्यात आली होती. या प्रकरणी वनविभागाने रविवारी 5 आरोपींना अटक केली आहे. नागोराव भास्कर टेकाम, सोनु भवानी टेकाम, गोली रामा टेकाम, बोनु तुकाराम टेकाम, तुकाराम भवानी टेकाम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी वरपोड येथील रहिवाशी आहेत. ही कारवाई पांढरकवडा वनविभाग आणि वणी पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे. तसेच यापूर्वी मोरगाव वनपरीक्षेत्रातील वाघाच्या शिकार प्रकरणी अन्य तीन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत २ वाघांच्या शिकार प्रकरणी ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वाघीण शिकार प्रकरणातील पाच आरोपींना अटक
आरोपींना पकडण्यासाठी पोलीस बंदोबस्त
25 एप्रिलला झाली वाघिणीची शिकार-मांगुर्ला जवळ वन क्रमांक 30 मध्ये 25 एप्रिल रोजी एका नाल्याच्या जवळील गुहेत एक वाघिण मृत अवस्थेत असल्याचे उघडकीस आले होते. वाघिणीच्या गळ्यात फास लावल्याचे आढळून आले होते. तसेच तिच्या शरीरावर हत्याराने वार केल्याचे आढळून आले होते. वाघिणीच्या पुढच्या पायाचे दोन्ही पंजे गायब होते. त्यामुळे शिकारीच्या उद्देशाने तिची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर वनविभागाच्या दुभाटी येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.
वाघीण शिकार प्रकरणातील पाच आरोपींना अटक

शंभरारावर कर्मचाऱ्यांचा फौजफाटा-

रविवारी देखील कारवाई करताना वन विभागाचा मोठा फौजफाटा घेऊन ताफा रविवारी मध्यरात्री 2.30 वाजताच्या सुमारास वरपोड या गावी पोहोचला. तिथे कोम्बिंग ऑपरेशन रावबत पथकाने सर्व आरोपींना अटक केली. मांगुर्ला येथे वाघिणीच्या क्रूरपणे हत्येकेल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. ही हत्या इतकी निर्घृण होती हत्या करणा-यांनी गुहे समोर आग लावली व वाघिणीचे दोन्ही पंजे तोडून नेले होते. विशेष म्हणजे ही वाघिण दोन महिन्याची गर्भवती होती. त्याच प्रकरणात पोलीस आणि वनविभागाच्या संयुक्त पथकाने सदर कारवाई केली. यावेळी वनविभाग आणि पोलीस असे शंभरावर कर्मचारी यांच्याकडून मोहीम राबविण्यात आली.

वाघीण शिकार प्रकरणातील पाच आरोपींना अटक
आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस बंदोबस्त

तसेच जिल्ह्याच्या मारेगाव वनपरीक्षेत्रात असलेल्या सोनेगाव जवळील आसन (उजाड) शिवारातील एका नाल्याजवळ दिनांक 23 मार्च 2021 रोजी एक पट्टेदार 125 ते 150 किलोची वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी संयुक्त पथकाने झरी तालुक्यातील येसापूर येथे दुसरी धाड टाकत 3 आरोपींना अटक केली. यात आरोपींच्या घराची झडती घेतली असता, त्यांच्याकडे वन्यप्राण्याचे मांस तसेच शिकार करण्याचे साहित्य आढळून आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.