ETV Bharat / state

खासगी 'कोविड' रुग्णालयात कोरोनाबाधितांची आर्थिक लूट; लाखो रुपयांचे बिल हाती - खासगी 'कोविड' रुग्णालय यवतमाळ

लसीकरणासाठी देण्यात येणाऱ्या रेमडीसीवर इंजेक्शनची किंमत 500 रुपये आहे मात्र, त्या इंजेक्शनसाठी खासगी रुग्णालय अतिरिक्त शुल्क आकारत आहे.

खासगी 'कोविड' रुग्णालयात कोरोनाबाधितांची आर्थिक लूट

author img

By

Published : Apr 11, 2021, 6:24 PM IST

Updated : Apr 11, 2021, 7:38 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील खाजगी कोविड रुग्णालयात कोरोनाबाधितांची आर्थिक लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एखाद्या कोरोनाबाधित रुग्णाला खासगी रुग्णालयात भरती करताना अडीच ते तीन लाख रुपये जमा करावे लागतात. यानंतरही रुग्णालयातून सुटी देताना त्यांना पक्के बीले दिले जात नाही. यातही अव्वाच्या सव्वा बिले रुग्णांच्या नातेवाईकांच्या हाती दिले जात असल्याचा प्रकार घडत आहे. ही आर्थिक लूट थांबावी आणि संबंधित रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी व्ही जर्नालिझम असोसिएशन आणि श्रमिक पत्रकार संघटनेने केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येगडे यांना निवेदनही देण्यात आले आहे.

खासगी 'कोविड' रुग्णालयात कोरोनाबाधितांची आर्थिक लूट

प्रशासनाकडून तक्रारीसाठी व्हॅटपस नंबर

शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांना डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून मान्यता देण्यात आली आहे. मात्र, काही खासगी रुग्णालय आपली मनमानी करत असल्याचे समोर आले आहे. लसीकरणासाठी देण्यात येणाऱ्या रेमडीसीवर इंजेक्शनची किंमत 500 रुपये आहे मात्र, त्या इंजेक्शनसाठी खासगी रुग्णालय अतिरिक्त शुल्क आकारत आहे. परिणामी ५०० रुपयांचे इंजेक्शनची कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांना चार हजार रुपयांना देण्यात येत असल्याची तक्रार आहे. covid१९takrar@gmail.com या ई-मेल आयडीवर तसेच 7276190790 या व्हॅटअप्स नंबरवर तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Last Updated : Apr 11, 2021, 7:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.