यवतमाळ - मारेगाव येथील तुळशिराम कवडू भोयर (४५) शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली.
तुळशिराम कवडू भोयर यांचे अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे खासगी व सोसायटी याचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत होते. त्याचेकडे ६ एकर कोरडवाहू शेत जमीन असून त्याचेवर सोसायटीचे एक लाख रुपये कर्ज व खासगी एक लाख रुपये कर्ज असल्याने ते कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत होते. मृताच्या मागे पत्नी, २ मुले व आई वडील असा आप्तपरिवार आहे.