ETV Bharat / state

रक्त आटवून पिकवलेला भाजीपाला संचारबंदीमुळे शेतात सडला; संतप्त शेतकऱ्याने पिकात सोडली जनावरे

कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ शेतकऱ्याचा पिच्छा सोडत नाही. या वर्षी कोरोनाच्या संकटाने यात अधिकच भर घातली. रक्त आटवून पिकवलेला कोबी, वांगे, बरबटी, काकडी आदी भाजीपाला शेतातच सडला. त्यामुळे शेतकऱ्याने उभ्या पिकात जनावरे सोडली.

Bhaji
सडलेला भाजीपाला
author img

By

Published : May 15, 2020, 11:09 AM IST

यवतमाळ - कोरोनामुळे सुरू असलेल्या संचारबंदीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. रक्त आटवून पिकवलेल्या भाजीपाल्यास सध्या पिकाला उठाव नाही. माल नेण्यासाठी वाहन वेळेत उपलब्ध होऊ शकले नाही. परिणामी कोबी, वांगे, बरबटी, काकडी आदी भाजीपाला शेतातच सडला. पिकांची दुर्दशा बघून रुई येथील शेतकऱ्याने उभ्या पिकात चरण्यासाठी जनावरांना सोडून रोटाव्हेटर फिरवले.

रक्त आटवून पिकवलेला भाजीपाला संचारबंदीमुळे शेतात सडला; संतप्त शेतकऱ्याने पिकात सोडली जनावरे

मागील पाच वर्षापासून शेतकरी सतत नापिकीचा सामना करत आहेत. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ शेतकऱ्याचा पिच्छा सोडत नाही. या वर्षी कोरोनाच्या संकटाने यात अधिकच भर घातली. मागील दीड महिन्यापासून शेतकरी कोरोनाचा सामना करत आहेत. अनेक शेतकरी पुन्हा एकदा कर्जबाजारी झाले आहेत. ठप्प झालेल्या बाजारपेठेमधून यवतमाळ तालुक्यातील शेतकरी देखील वाचू शकले नाहीत. रुई (वाई) येथील भाविक गणेश ठक या तरुण शेतकऱ्याने शेतीला आधुनिकतेची जोड दिली. पाच एकर क्षेत्रावर भाजीपाल्याची त्यांनी लागवड केली. रक्त आटवून या शेतकऱ्याने भाजीपाला पिकवला. भाजीपाला विक्रीची वेळ येताच कोरोनाचे संकट आले.

वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने पिकाला उठाव नाही. माल नेण्यासाठी वाहन वेळेत उपलब्ध होऊ शकले नाही. परिणामी कोबी, वांगे, बरबटी, काकडी आदी भाजीपाला शेतातच सडला. पिकांची दुर्दशा बघून उभ्या पिकात त्यांनी चरण्यासाठी जनावरांना सोडले. त्यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. त्यांचा लागवडीचा देखील खर्च निघू शकला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.