यवतमाळ - महागाव तालुक्यातील राजुरा शिवारात एका शेतकऱ्यावर तीन अस्वलांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. कोठारी येथील रहिवासी असलेले आत्माराम ठाकरे, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेत ठाकरे गंभीर जखमी झाले आहेत.
हेही वाचा - गोंदियात दोन अस्वलांच्या हल्ल्यात शेतकरी ठार
ठाकरे नेहमीप्रमाणे शेतात काम करत होते. अचानक त्यांच्यावर तीन अस्वलांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. ठाकरे यांनी आरडाओरड केल्यानंतर बाजूच्या शेतातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी घाव घेऊन त्यांची सुटका केली. उमरखेड येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.