ETV Bharat / state

वाजत-गाजत केले कन्या प्राप्तीचे स्वागत; चिमुकलीच्या पावलाने लक्ष्मी आल्याचा विश्वास

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद लगतच्या श्रीरामपूर या गावात मुलीच्या जन्माचे मोठ्या आनंदाने स्वागत करण्यात आले. नवजात कन्येला लक्ष्मी समजुन बॅंड-बाजाच्या गजरात, नाचून गाऊन तिचे स्वागत केले.

कन्या प्राप्तीचा साजरा केला उत्सव
author img

By

Published : Jul 26, 2019, 6:21 PM IST

Updated : Jul 26, 2019, 8:20 PM IST

यवतमाळ - समाजात मुलींचा जन्म होण्यापूर्वीच त्यांना गर्भात मारण्याचे प्रकार घडत असतात. मात्र ,समाजात अशी काही कुटुंबे आहेत, जी मुलीच्या जन्माचा उत्सव साजरा करतात. यवतमाळ जिल्ह्यातील पूसद लगतच्या श्रीरामपूर या गावात मुलीच्या जन्माचे मोठ्या आनंदाने स्वागत करण्यात आले.

कन्या प्राप्तीचा साजरा केला उत्सव

जिल्ह्यातील पुसद लगतच्या श्रीरामपूर येथील ममता प्रकाश खडके यांचा विवाह मागील वर्षी औरंगाबाद येथील चतूर कुटुंबामध्ये झाला होता. नुकताच तिने मुलीला जन्म दिला. तिच्या सासरच्यांनी घरी येणाऱ्या नवजात कन्येला लक्ष्मी समजून बॅंड-बाजाच्या गजरात, नाचून गाऊन तिचे स्वागत केले. चिमुकलीचे वडील अभिषेक चतूर, काका स्वप्निल चतूर व संपूर्ण चतूर कुटूंबाने अशाप्रकारे कन्येचे स्वागत करुन पुरुष प्रधान संस्कृतीला चपराक दिली आहे. त्यांनी पुन्हा मातृसत्ताक संस्कृतीचा संदेश दिला आहे. ममता आणि तिच्या कुटुंबाने वाजत-गाजत आपल्या लक्ष्मीरुपी कन्येचे स्वागत केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे चतुर कुटूंबाचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

Intro:लक्ष्मीचे केले वाजत गाजत स्वागतBody:यवतमाळ : समाजात मुलींच्या जातीचा जन्म होण्यापूर्वीच त्यांना गर्भातच मारण्याचे प्रकार घडत असल्याचे आपल्यास पहावयास मिळते. तर या समाजात असे काही कुटुंबे असतात मुलीच्या जन्माचा जन्मोत्सव साजरा करतात. "मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी" आणि म्हणूनच मुलीच्या जन्माचं मोठ्या आनंदाने स्वागत करण्यात आले.
जिल्ह्यातील पुसद लगतच्या श्रीरामपूर येथील ममता प्रकाश खडके हिचे लग्न मागील वर्षी औरंगाबाद येथील चतुर परिवारासोबत झाले. नुकतेच तिने मुलीला जन्म दिल्यानंतर तिच्या सासरच्यांनी घरी येणाऱ्या नवजात कन्येला लक्ष्मी मानून बॅंडबाजाच्या गजरात व नाचून गाऊन तिचे स्वागत करण्यात आले.
चिमुकलीचे वडील अभिषेक चतुर, काका स्वप्निल चतुर व संपूर्ण चतुर परिवाराने अशाप्रकारे कन्येचे स्वागत करुन पुरुष प्रधान संस्कृतीला चपराक देत पुन्हा मातृसत्ताक संस्कृतीचा संदेश दिला. आहे. ममता आणि तिच्या परिवाराने ज्याप्रकारे वाजतगाजत आपल्या लक्ष्मीरुपी कन्येचे स्वागत केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे चतुर परिवाराच जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
Conclusion:
Last Updated : Jul 26, 2019, 8:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.