ETV Bharat / state

तूर खरेदीत शासनाचीच फसवणूक; दारव्ह्यातील प्रताप

दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कमी किमतीत तूर खरेदी करून शासनाला जास्त भावात विक्री करून कोटींची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दारव्हा येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवकासह एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

author img

By

Published : Feb 13, 2020, 9:20 PM IST

तूर खरेदीत शासनाला कोटींनी लुबाडले
तूर खरेदीत शासनाला कोटींनी लुबाडले

यवतमाळ - शेतकर्‍यांकडून कमी किमतीत तूर खरेदी करून कृषी उत्पन्न बाजार समिती व नाफेडला जास्त भावात विक्री केली. या फसवणुकीप्रकरणी दारव्हा येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवकासह एका व्यक्तीला गजाआड करण्यात आले. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेने केली असून यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक हरि काशिनाथ गुल्हाने, अमीन बाहोद्दीन मलनस अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

तूर खरेदीत शासनाला कोटींनी लुबाडले

दारव्हा तालुक्यातील शेतकर्‍यांकडून कमी किमतीत तुरीची खरेदी करून कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ दारव्हा येथे नाफेडला जास्त भावात विक्री केली. त्यात शासनाची १ कोटी ४१ लाख ८२ हजार ८६३ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सहायक निबंधक अंतर्गत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथा प्रभारी मार्केटिंग अधिकारी यांनी १३ ऑक्टोबर २०१८ ला दारव्हा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता.

हेही वाचा - बनावट कागदपत्राद्वारे मिळवले कंत्राट, २ कंत्राटदारांसह ५ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

माजी नगराध्यक्ष गुल्हाने व बमीन मलसन या दोघांनी २०१८ मध्ये अप्पर सत्र न्यायालय दारव्हा येथे अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज सादर केला. मात्र, न्यायालयाने दोघांचाही जामीन अर्ज नामंजूर केला होता. तेव्हापासून त्यांच्या अटकेची कारवाई होणे बाकी होते. अखेर दोघांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - लिफ्टखाली आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह; ओळख अस्पष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.