यवतमाळ - गेल्या दोन वर्षापासून सर्वच उत्सवांवर कोरोनाचे सावट होते़. यावर्षी राज्य शासनाने निर्बंध हटवल्यामुळे यवतमाळचा दुर्गादेवी उत्सव यावर्षी मोठ्या प्रमाणात व हर्षेाल्हासात साजरा होणार आहे. 26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव प्रारंभ होणार आहे़. यवतमाळ येथील दारव्हा मार्गावरील शिवराय दुर्गा देवी उत्सव मंडळाची देखील जोरदार तयारी सुरू असून यावर्षी मोठ्या प्रमाणात रोषनाई करण्यात येत आहे़. (Durga festival 2022) त्याचप्रमाणे या मंडळाकडून मंदिराचा आर्कषक देखावा साकार होत आहे़. वडगाव येथील दुर्गा उत्सव मंडळाची मोठया प्रमाणात तयारी असून येथे विद्युत रोषनाई व देखावा सादर करण्यात येणार आहे.
सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन - स्टेट बँक चौक, चांदणी चौक, जय हिंद चौक, माळीपुरा, शिवाजी चौक, लोखंडी पूल, आठवडी बाजार देवी मंदिरात जय्यत तयारी सुरू असून लोखंडी पुल ते कॉटन मार्केटपर्यंत मोठया प्रमाणात रोषनाई असणार आहे़. यासाठी विवीध मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत. नवरारात्र ऊत्सवात शहरात मोठ्या प्रमाणात जगरता होणार आहे. विवीध ठिकाणी सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येणार आहे.
भाविकांचा अलोट सागर - जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्हा बाहेरील भाविक यवतमाळ येथे नवरात्र उत्सवा दरम्यान दाखल होत असतात. दर्शनासाठी ठिक ठिकाणच्या मंडळांसमोर देवीच्या दशर्नासाठी भाविकांचा अलोट सागर बघायला मिळतो. यावर्षी देखील याची प्रचिती येणार आहे. ठिकठीकाणी नऊ दिवस महाप्रसादाचे वितरण होत असते.
9 दिवस महाप्रसादाचे वितरण - यावर्षी बालाजी दुर्गादेवी उत्सव मंडळातर्फे तयारी सुरू असून, मंडळाच्या अध्यक्षासह सर्वच सदस्य परिश्रम घेत आहेत. यावर्षी देखावा सादर करण्यासाठी कलकत्त्यातून कारागिरांना पाचारण केले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हे कारागीर देखावा निर्माण करण्यासाठी झटत आहेत. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी 9 दिवस महाप्रसादाचे वितरण होणार आहे.