यवतमाळ - केंद्र शासनाच्या सुचनेनुसार कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोजचा कालावधी 12 ते 16 आठवड्यांनी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे कोविशिल्ड लसीचा पहिला डोज दिल्यानंतर दुसर डोस 12 ते 16 आठवड्याच्या अंतराने देण्यात येणार आहे. तर कोव्हॅक्सीन लसीच्या कालावधीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोज पूर्वीप्रमाणेच चार आठवड्याच्या अंतराने देण्यात येणार आहे.
साडेतीन लाख नागरिकांचे लसीकरण -
उपलब्ध लसीचा साठा प्राधान्याने दुसऱ्या डोजसाठी वापरण्यात येणार तसेच कोविशिल्ड लसीचा उपलब्ध साठ्यातील ज्या हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंट लाईन वर्कर यांचा दुसरा डोस शिल्लक आहे, त्यांना प्राधान्याने तर उर्वरीत साठा 45 वर्षांवरील वयोगटातील लाभार्थ्यांच्या पहिल्या डोजसाठी वापरण्यात येईल. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 3 लक्ष 42 हजार 225 जणांचे लसीकरण झाले असून गुरूवारी एकाच दिवशी 3318 लोकांचे लसीकरण करण्यात आले.
हेही वाचा - पुणे : एकाच दिवसात दोन सख्ख्या भावांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू