यवतमाळ - महागाव तालुक्यातील वेणी येथे शॉर्टसर्किटमुळे निघालेल्या ठिणगीतून ७ एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. ही घटना काल रात्री ९ च्या सुमारास घडली. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकरी नानू चव्हाण यांनी केला आहे.
चव्हाण यांच्या शेतातून विद्युत तार गेले आहेत. काल विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन ठिणगी ऊस पिकात पडल्याने पिकाला आग लागल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे जवळपास आठ ते दहा लाखाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, कृषी, महसूल व वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन नुकसाणीची पाहाणी केली आहे. वीज वितरण कंपनीने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी चव्हाण यांनी केली आहे.
हेही वाचा- यवतमाळ: राज्य सरकारच्या पॅकेजची घोषणा हवेत; शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच