ETV Bharat / state

Rain In Yavatmal District: यवतमाळ जिल्ह्यात संततधार पावसामुळे अनेक गावांना पुराचा वेढा - Rain In Yavatmal District

संततधार पावसाने वर्धा व रामगंगा या नद्यांना व नाल्यांना प्रचंड पूर येऊन वरुड जहांगीर, नागठाना, गुजरी, सावंगी, झाडगाव, रामगँगा, एकबुर्जी, भांब, रावेरी, चहांद, पिंपळखुटी गावात पुराचे पाणी शिरले होते. संपूर्ण शेतीक्षेत्र पाण्याखाली आल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात संततधार पावसामुळे अनेक गावांना पुराचा वेढा

author img

By

Published : Jul 24, 2022, 4:04 PM IST

यवतमाळ - यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक गावना पुराने वेढा घातला आहे. गेल्या ८० वर्षात बघितला नसेल असा पूर यंदा बघायला मिळत असल्याचे जुने जाणकार सांगत आहेत. ( Rain In Yavatmal District ) एवढ्या वर्षात पहिल्यावेळी असा पूर पाहिला आहे दापोरी या आमच्या गावाला पुराच्या पाण्याने वेढून धरले होते. कसाबसा मी आमचा जीव वाचवला आता या गावाला पुनर्वसन करा अशी मागणी गावकरी बाबाराव आंबटकर यांनी केली आहे.

पाणी शिरल्याने ग्रामस्थांनी शाळांचा आसरा घेतला - संततधार पावसाने वर्धा व रामगंगा या नद्यांना व नाल्यांना प्रचंड पूर येऊन वरुड जहांगीर, नागठाना, गुजरी, सावंगी, झाडगाव, रामगँगा, एकबुर्जी, भांब, रावेरी, चहांद, पिंपळखुटी गावात पुराचे पाणी शिरले होते. संपूर्ण शेतीक्षेत्र पाण्याखाली आल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेती साहित्य, बैलगाडी, लाकडी वखर, नांगर पुरात वाहून गेले आहे. अनेक जनावरे पुराच्या पाण्यात अडकली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांनी शाळांचा आसरा घेतला आहे.

झाडगाव येथील १०० वर कुटुंब सुरक्षित स्थळी हलवले - राळेगाव तालुक्यातील दापोरी जागजई कळमनेर वालदूर झाडगाव या गावांना चोहोबाजुंनी पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. गावातील घरांमध्ये पाणी शिरल्याने १०० हून अधिक कुटुंबियांना शाळेत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. सतत असलेल्या संततधार पावसामुळे दापुरी जागजाई कळमनेर वालदूर झाडगाव जलमय झाले होते. वर्धा नर्मदा आणि रामगंगा या तिहरी नदीचा संगम आहे. नंदिनी नदीवर वरुड या गावाजवळ लघु प्रकल्प आहेत.

शासनाने हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी - सुरू असलेल्या पाण्यामुळे या प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्याने ओव्हर फ्लो होऊन यातील पाणी झाडगाव या गावांमध्ये जाऊन जवळपास शंभरावर घरात शिरले आहे. त्यामुळे संसारपयोगी साहित्यासह अन्नधान्य भिजल्याने हे कुटुंबीय उघड्यावर आले आहे. शेतकऱ्यांचे शेतीपयोगी साहित्य वाहून गेले असून, शेती पिके पाण्यात बुडून सडली आहे. प्रशासनाने याठिकाणी तातडीने मदतकार्य करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. शासनाने हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी अशी, मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद धुर्वे यांनी केली आहे.

हेही वाचा - देशासाठी पदक जिंकणे अभिमानाची बाब - नीरज चोप्राने देशवासियांचे मानले आभार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.