ETV Bharat / state

डॉ. अतुल गावंडे यांची अमेरिकेच्या कोरोना नियंत्रण मंडळात नियुक्ती - Yavatmal District Latest News

अमेरिकेमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो. बायडेन यांनी कोरोना व्हायरस अ‍ॅडव्हायझरी बोर्डाची घोषणा केली आहे. या बोर्डाच्या सदस्यांमध्ये डॉक्टर अतुल गावंडे यांचा समावेश करण्यात आला आहे.

US Corona Virus Advisory Board
डॉ. अतुल गावंडे यांची अमेरिकेच्या कोरोना नियंत्रण मंडळात नियुक्ती
author img

By

Published : Nov 22, 2020, 8:04 PM IST

यवतमाळ - अमेरिकेमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो. बायडेन यांनी कोरोना व्हायरस अ‍ॅडव्हायझरी बोर्डाची घोषणा केली आहे. या बोर्डाच्या सदस्यांमध्ये डॉक्टर अतुल गावंडे यांचा समावेश करण्यात आला आहे. डॉ. अतुल गावंडे हे मूळ यवतमाळ जिल्ह्यातल्या उटी गावचे आहेत.

अतुल गावंडे यांच्यावर अमेरिकेतील प्रशासनाने मोठी जबाबदारी टाकल्याने, उटी गावच्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांचे वडील डॉ. आत्माराम गावंडे यांचा जन्म उटीमध्ये 9 सप्टेंबर 1934 झाला. त्यानंतर त्यांनी नागपूर येथे वैद्यकीय शिक्षण घेतले, त्यानंतर ते 1963 साली ते न्यूयार्कला गेले. त्याच ठिकाणी डॉ. अतुल गावंडे यांचा जन्म झाला.

डॉ. अतुल गावंडे यांची अमेरिकेच्या कोरोना नियंत्रण मंडळात नियुक्ती

डॉ. आत्माराम गावंडे अमेरिकेत डॉ. म्हणून काम करत असताना त्यांनी आपल्या भारतातील उटी गावाकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही. सुरुवातीला ते 4 ते 5 वर्षांनी गावाकडे यायचे. त्यानंतर मात्र ते दरवर्षी इकडे येत होते. कधी कधी 8 ते 10 दिवस मुक्काम करून मित्रांना भेटायचे. याच दरम्यान त्यांनी उमरखेडचे गोपिकाबाई सीताराम गावंडे कॉलेज दत्तक घेतले. कॉलेजमध्ये अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. दुर्दैवाने 2011साली डॉ. आत्माराम गावंडे यांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांची सर्व जबाबदारी डॉ. अतुल यांनी स्वीकारून गावाशी असलेलं नातं कायम ठेवलं. ते इकडे आले की महाविद्यालयात जास्तीत जास्त वेळ घालवतात. स्थानिक नातेवाईकांच्या भेटी घेतात, त्यात त्यांना आनंद मिळतो.

जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब

उटी हे महागाव तालुक्यातील 3 हजार लोकवस्तीचे गाव आहे. या छोट्या गावात जन्मलेले आत्माराम गावंडे यांनी अमेरिकेमध्ये मोठे नाव कमावले. आता त्यांचा मुलगा डॉ. अतुल गावंडे हा सुद्धा अमेरिकेत आपले नाव कमावतो आहे. जगातील एका बलाढ्य देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची कोविड नियंत्रण चमूमध्ये नियुक्ती केली. ही नातेवाईकांसाठी अभिमानाची बाब आहे. ग्रामीण विद्यार्थांसाठी अतुल गावंडे हे आदर्श ठरले आहेत.

गावंडे यांनी सांभाळली बिल क्लिंटन यांच्या प्रचाराची धुरा

डॉ. आत्माराम गावंडे हे अमेरिकेत स्थिरावल्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी एका भारतीय गुजराती डॉ. सुशीला गोस्वामी नावाच्या तरुणीशी विवाह केला. त्यांना अतुल आणि सुनिता अशी दोन अपत्य झाली. अतुल हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांनी अमेरिकेच्या निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.