यवतमाळ - जिल्ह्यातील कर्जदारांना जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिलासा दिला आहे. ज्या कर्जदारांना वसुलीसाठी नोटीस देण्यात आली, त्यांनी कर्जाची 20 टक्के रक्कम भरल्यास त्यांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर थकीत कर्जदारांवर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिलेत.
बिगरशेतीचे 150 कोटी थकीत
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बिगरशेतीचे जवळपास 150 कोटी वसुली कृती कार्यक्रमांतर्गत थकीत वसुली करण्याबाबतचे निर्देश वसुली विभाग प्रमुखांना देण्यात आलेत. जिल्ह्याबाहेरील थकीत वसुली करण्यासाठी वसुली अधिकारी यांना विशेष अधिकार प्राप्त होण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. शेतकरी, बिगर शेतकरी सभासद तसेच बँक कर्मचाऱ्यांना बँकेच्या धोरणानुसार विविध उद्देशाकरीता कर्ज मंजूर करण्यात आले. बँकेच्या 2 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून चुकीच्या कर्जवाटपाची जबाबदारी देखील त्यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे.
वसुलीचा आढावा
दिवाळीचा विचार करता अनेक शिक्षकांना ओव्हर ड्राफ्ट (ओ.डी.) व मध्यम मुदतीचे कर्ज मंजूर करण्यात आले. पगारदार कॅश क्रेडीट कर्ज प्रकरणांच्या कर्ज मर्यादेचे नुतनीकरण करण्यात आले असून कॅश क्रेडीट कर्ज प्रकरणाचा यावेळी आढावा घेतला. तसेच हंगाम सन 2019-20 मधील कर्ज मागणी व वसुलीचा आढावा घेण्यात आला. सन 2020-21 मधील कर्ज मागणीची नोंद घेण्यात आली. बँकेचा डाटा सुरक्षिततेच्या दृष्टीने डीआर साईट सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे व विभागाचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
कर्जदारांसाठी डिसेंबरपर्यंत परतफेडीची मुदत; अन्यथा वसुलीची कारवाई - REPAYMENT PERIOPD EXTENDED IN FOR DEBTOR IN YAVATMAL
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 20 टक्के रक्कम भरणाऱ्या कर्जदारांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर कर्जदारांवर कादेशीर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.