ETV Bharat / state

testing - Partha Pratim ( do not remove) यवतमाळ : टिपेश्वर अभयारण्यातील टी-४ वाघिणीचा मृत्यू

वाघिणीच्या गळ्यामध्ये तार अडकल्याने तिची हालचाल फारच मंदावली होती. तिला बेशुद्ध करून उपचार करण्यासाठी नेत असताना तिचा मृत्यू झाला.

author img

By

Published : Mar 19, 2019, 9:49 AM IST

Updated : Mar 19, 2019, 12:29 PM IST

मृत टी-४ वाघीण

testing Partha Pratim - do not remove

यवतमाळ - जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यामध्ये असलेल्या टी-४ वाघिणीच्या गळ्यात २ वर्षांपूर्वी तार अडकली होती. काल तिला बेशुद्ध करून उपचार करण्यासाठी नेत असताना तिचा मृत्यू झाल्याची माहिती टिपेश्वर अभयारण्याचे विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) प्र. बा. पंचभाई यांनी दिली.

टी-४ वाघिणीच्या गळ्यामध्ये ११ सप्टेंबर २०१७ ला तार अडकल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार टी-४ वाघिणीला उपचार करण्यासाठी जेरबंद करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, या वाघिणीचे वास्तव्य अभयारण्य क्षेत्रातील पाणवठ्यावर फक्त रात्रीच्याच दरम्यान होत असल्याचे कॅमेऱ्यात ट्रॅप झाले होते. रात्रीच्या वेळेस तिला बेशुद्ध करणे शक्य होत नव्हते. ही वाघीण टिपेश्वर अभयारण्यात ५ मे २०१८ पर्यंत निदर्शनास आली होती. त्यानंतर ती अभयारण्य क्षेत्रात प्रत्यक्ष दिसली नाही किंवा कॅमेरामध्येही ट्रॅप झाली नव्हती.

१६ मार्च रोजी ही वाघीण अभयारण्यातील कक्ष क्रमांक १३३ मध्ये कॅमेरात ट्रॅप झाली. १७ मार्च रोजी क्षेत्रीय सनियंत्रण चमू वाघिणीच्या हालचालीच्या नियंत्रणाकरिता या ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्याकरिता गेले असता, दुपारी साडेचारच्या सुमारास ही वाघीण नाल्यांमध्ये निदर्शनास आली. वाघिणीच्या गळ्यामध्ये तार अडकल्याने तिची हालचाल फारच मंदावली होती. तसेच तिला नीट उभे सुद्धा राहणे शक्य नसल्याचे निदर्शनास आले.

टी-४ ला जेरबंद करून तिच्यावर उपचार करण्यासाठी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास तिला बेशुद्ध करण्यात आले. बेशुद्ध झाल्यानंतर तिला तत्काळ उपचाराकरिता रेस्क्यू व्हॅनमधील पिंजऱ्यात टाकण्यात आले होते. दरम्यान ८ वाजताच्या सुमारास वाघीण मृत झाल्याचे निष्पन्न झाले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वाघिणीचेमार्च १८ मार्च रोजी टिपेश्वर अभयारण्य शव विच्छेदन करण्यात आलेआहे. वाघिणीला जेरबंद करताना एक कर्मचारी जखमी झाला आहे.

Intro:टिपेश्वर अभयारण्यातील टि-४ वाघिणीचा मृत्यू
Body:यवतमाळ - जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य मध्ये असलेल्या टि-४ वाघिणीचा गळ्यात
दोन वर्षांपूर्वी तार अडकला होता. काल तिला बेशुद्ध करून उपचार करण्यासाठी नेत असताना तिचा मृत्यू झाल्याची माहिती टिपेश्वर अभयारण्यातचे विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) प्र.बा. पंचभाई यांनी दिली. टिपेश्वर अभयारण्यमध्ये असलेली टि-४ वाघीनीच्या गळ्यामध्ये ११ सप्टेंबर २०१७ ला तार टाकल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांचे मार्गदर्शनात टि-४ वाघिणीला उपचार करण्यासाठी जेरबंद करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. मात्र या टि-४वाघिणीचे वास्तव्य अभयारण्य क्षेत्रातील पाणवठ्यावर फक्त रात्रीच्याच दरम्यान होत असल्याचे कॅमेरा ट्रॅप झाले होते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस तिला
बेशुद्ध करणे शक्य होत नव्हते. ही वाघीण टिपेश्वर अभयारण्यात ५ मे २०१८ पर्यंत निदर्शनास आली होती. त्यानंतर ती अभयारण्य क्षेत्रात प्रत्यक्ष दिसली नाही किंवा कॅमेरा मध्येही ट्रॅप झाली नव्हती. मात्र काल १६ मार्च रोजी ही ही वाघीण अभयारण्यातील कक्ष क्रमांक १३३ मध्ये कॅमेरात ट्रॅप झाली. १७ मार्च रोजी क्षेत्रीय सनियंत्रण चमू वाघिणीच्या हालचालीचे नियंत्रणाकरिता या ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्याकरिता गेले असता, दुपारी साडेचारच्या सुमारास ही वाघीण नाल्यांमध्ये प्रत्यक्ष निदर्शनास आली. वाघिणीच्या गळ्यामध्ये तार अडकल्याने तिची हालचाल फारच मंदावली होती. तसेच तिला नीट उभे सुद्धा राहणे शक्य नसल्याचे निदर्शनास आले. तेव्हा तिला जेरबंद करून तिच्यावर उपचार करण्यासाठी टी-४ वाघिणीला संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास बेशुद्ध करण्यात आले. ही वाघीण बेशुद्ध झाल्यानंतर तिला तात्काळ उपचाराकरिता रेस्क्यू व्हेन मधील पिंजरा टाकण्यात आले होते. दरम्यान ८ वाजताच्या सुमारास वाघीण मृत झाल्याचे निष्पन्न झाले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर वाहिनीचे १८मार्चरोजी टिपेश्वर अभयारण्य शव विच्छेदन करण्यात येणार आहे.Conclusion:या t4 वाघिणीचा फोटो उपलब्ध होऊ शकला नाही
Last Updated : Mar 19, 2019, 12:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.