ETV Bharat / state

दारव्ह्याच्या शिवसेना नगरसेवकाने केली चक्क वनमंत्री पदाची मागणी

author img

By

Published : Mar 15, 2021, 12:45 PM IST

Updated : Mar 15, 2021, 12:51 PM IST

राठोड यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर हे पद रिक्त झाल्यानंतर या पदावर वर्णी लावण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांकडून फिल्डींग लावणे सुरू झाले. त्याच प्रमाणे दारव्हाचे नगरसेवक रवी तरटे यांनी देखील 'माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा' अशी मागणी केली आहे.

नगरसेवकाने केली चक्क वनमंत्री पदाची मागणी

यवतमाळ - राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनामामुळे रिक्त झालेल्या पदावर कुणाची वर्णी लागणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या पदावर आता काही जणांनी दावा देखील केला आहे. यात संजय राठोड यांच्याच मतदारसंघातील दारव्हा नगरपरिषदेमधील शिवसेना नगरसेवकाने मंत्रीपदावर दावा केला आहे. या नगरसेवकाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. रवी तरटे असे त्या नगरसेवकाचे नाव आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर शिवसेना नेते संजया राठोड यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर हे पद रिक्त झाल्यानंतर या पदावर वर्णी लावण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांकडून फिल्डींग लावणे सुरू झाले. त्याच प्रमाणे दारव्हाचे नगरसेवक रवी तरटे यांनी देखील 'माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा' अशी मागणी केली आहे. तरटे हे दारव्हा येथील प्रभाग 4 मधून शिवसेनेचे नगरसेवक आहेत.

मुख्यमंत्र्यांना पाठविले मागणीचे पत्र-

माझी शिवसैनिक म्हणून या पदावर निवड करावी, माझी मंत्रीमंडळात नियुक्ती केल्यास विदर्भाला मंत्रिमंडळात स्थान मिळेल. राठोड यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त जागेसाठी पक्षात चढाओढ लागली आहे. विधानसभा मतदारसंघातील असून मला संजय राठोड यांचेही मार्गदर्शन लाभेल. माझ्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन मला विधान परिषदेवर घेऊन वन खात्याचं मंत्रीपद द्यावे, अशी मागणी तरटे यांनी केली आहे.

यापूर्वी हरिभाऊ राठोड यांनी देखील संजय राठोड यांच्या रिक्त झालेल्या मंत्रीपदावर वर्णी लागावी यासाठी उद्धव ठाकरे यांना पत्र व्यवहार केला आहे.

Last Updated : Mar 15, 2021, 12:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.