यवतमाळ - एका अनोळखी विवाहितेचा सोयाबीनच्या कुटारात जळलेल्या अवस्थेत शुक्रवारी माळ असोला येथे मृतदेह आढळला होता. दरम्यान शुक्रवारी 6 जानेवारीला त्या महिलेची ओळख पटली आहे. शरीर संबंध ठेवू न दिल्याने पतीनेच आधी गळा आवळून त्यानंतर सोयाबीनच्या कुटारात जीवंत जाळून ( Husband Killed Wife And Burn Dead Body In Farm ) पत्नीचा निर्घृण खून केला. याबाबतची धक्कादायक कबुली दस्तूरखूद्ध पतीनेच पोलिसांपुढे दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. माया संजय साखरे असे त्या खून ( Wife Refuses Physical Relation Murder By Husband ) करण्यात आलेल्या पत्नीचे तर संजय साखरे असे मारेकरी पतीचे नाव आहे. दरम्यान मारेकरी पती संजय साखरे याला न्यायालयात हजर केले असता, त्याला एका दिवसाची कोठडी ठोठावण्यात ( Court Order One Day Custody ) आली आहे.
सोयाबीनच्या कुटारात अर्धवट जळलेला महिलेचा मृतदेह माळ असोला येथे 5 जानेवारी 2023 रोजी बाबूलाल चव्हाण यांच्या शेतातील सोयाबीनच्या कुटारामध्ये एका अनोळखी महिलेचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून ( Found Woman Burn Dead Body In Yavatmal ) आला होता. घटनेनंतर माळआसोला येथील सरपंचानी पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजीव हाके यांना ही माहिती दिली. या माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, ठाणेदार राजीव हाके, ठाणेदार बिटरगाव प्रताप भोष, सहायक पोलीस निरीक्षक सांगळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पंडीत, उपनिरिक्षक गणेश राठोड, किसन राठोड, प्रकाश बोंबले, राम गडदे रुपेश चव्हाण, संदीप ठाकुर नितीन खवडे मुन्ना आडे, परशुराम इंगोले, यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली.
हातात बांगड्यावरुन मृतदेहाचा उलगडा सोयाबीनच्या कुटारात जळालेल्या मृतदेहाच्या हातात बांगड्या दिसून आल्याने हा महिलेचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर घटनास्थळाच्या शेजारी शेत असलेल्या संजय साखरे यांची पत्नी मायाबाई साखरे ही सकाळपासून गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे संजय साखरे यांना संशयावरुन पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी पोपळी पोलीस ठाण्यात कलम 302,201 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करुन संजय साखरे याच्यावरच संशय निर्माण झाल्याने त्याची सखोल विचारपूस केली. सुरूवातीला संजय साखरेने उडउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर विश्वासात घेत पोलिसी खाक्या दाखवताच संजय साखरेने गुन्ह्याची कबुली दिली.
कुटारात मृतदेह जाळला मृत मायाबाई संजय साखरे ही मागील बरेच दिवसापासून आरोपीस शारीरिक संबंध ठेऊ देत नव्हती. घटनेवेळी सुद्धा मृत ही शेतात काम करीत असताना आरोपी संजयने शेतात कुणी नसल्याचा फायदा घेऊन मृत पत्नीकडे शरीर सुखाची मागणी केली. मृत पत्नीने त्यास नकार दिला. त्यामुळे रागामध्ये संजयने तिचा नायलॉन दोरीने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दगडाने तिचे छातीमध्ये वार केल्याने तिचा मृत्यू झाला. यामुळे भयभीत झालेल्या संजयने शेजारच्या शेतातील सोयाबीनच्या कुटारात मृतदेह जाळून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.