ETV Bharat / state

निसर्गाच्या दृष्टचक्रात भंगणार का उच्चशिक्षित तरुणाच्या शेतीचे स्वप्न? जिल्ह्यातील साडेपाच लाख हेक्टरवरील कपाशी आली धोक्यात - Rain

यवतमाळ जिल्ह्यातील साडेपाच लाख हेक्‍टरवर लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या कपाशीचे पीक पावसाने खंड दिल्याने वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. येथील शेतकऱ्यांना कपाशी लागवडीपासून तर महागडी खते, कीटकनाशक, डवरणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च आला. मात्र, पावसाने दडी मारली तर संपूर्ण खरीप हंगामातील हे नगदी पीक वाया जाणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील साडेपाच लाख हेक्टरवरील कपाशी आली धोक्यात
author img

By

Published : Jul 19, 2019, 11:28 PM IST

यवतमाळ - आजकाल शेतीमध्ये काही राहीले नाही. शेतीमध्ये खुप जोखीम असते. त्यापेक्षा नोकरी परवडली, अशी अनेक वाक्ये आपल्या कानी पडतात. त्यामुळे घरची जमीन असूनही आजचा तरुण शेतीकडे पाठ फिरवतो. परंतु यवतमाळमधील जय भगत या उच्चशिक्षित तरूणाने ३५ हजार पगाराच्या नोकरीवर लाथ मारून घरची शेती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचे स्वप्न निसर्गाच्या दुष्टचक्रात भंगणार की काय? अशी स्थिती आज निर्माण झाली आहे. मागील २२ दिवसापासून पाऊस न आल्याने शेतातील कपाशीचे पीक वाया जाण्याच्या मार्गावर आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील साडेपाच लाख हेक्टरवरील कपाशी आली धोक्यात

जय भगत या तरूणाने जेडी आर्ट, बीए, अॅनिमेशन इंजिनिअरिंग असे उच्चशिक्षण घेतले. त्याच्या कर्तुत्वावर त्याने हैदराबाद येथे नोकरी मिळवली. परंतु दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा घरची मालकी बरी, असे म्हणत त्याने आपली वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने शेतात कपाशीची लागवड केली. परंतु, पावसाने दडी मारल्याने सध्या हा युवा शेतकरी मोठ्या चिंतेत पडला आहे.

कपाशी लागवडीपासून तर महागडी खते, कीटकनाशक, डवरणी, निंदणीचा आतापर्यंत एकरी ६ ते ८ हजाराचा खर्च आला. मात्र, उत्पादन कमी येणार असल्याने शेती नुकसानीत आहे. अशातच जर पावसाने दडी मारली तर संपूर्ण खरीप हंगामातील हे नगदी पीक वाया जाणार आहे, अशी खंत जयने ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.

हे एक प्रातिनिधिक उदाहरण असून हीच स्थिती आज जिल्ह्यातील साडेपाच लाख हेक्‍टरवर लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या कपाशीची आहेत. काही ठिकाणी कपाशीची दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणी झाली आहे. मात्र, पावसाने खंड दिल्याने संपूर्ण पीकच वाया जाण्याच्या मार्गावर आहे. लागवडीचा हंगामही संपल्याने खरिपाच्या या नगदी पीकाचे वाढ खुंटणार आहे. त्यामुळे उत्पादनातही घट होणार आहे. तर निसर्गाची साथ लाभली नाही तर रब्बी हंगामातील पिके घेण्यावाचून पर्याय राहणार नाही. त्यामुळे आता भिस्त केवळ रब्बी हंगामावर अवलंबून राहणार आहे.

Intro:निसर्गाच्या दृष्टचक्रात भंगार का उच्चशिक्षित तरुणाच्या शेतीचे स्वप्न; जिल्ह्यातील साडेपाच लाख हेक्टरवरील कपाशी आली धोक्यातBody:यवतमाळ : आजकाल शेतीमध्ये काही राहीले नाही, शेतीमध्ये खुप जोखिम असते. त्यापेक्षा नोकरी परवडली अशी अनेक वाक्य आपल्या कानी पडतात. आणि मग घरची जमिन असुनही आजचा तरुण शेतीकडे पाठ फिरवतो. एखादी पदवी पुर्ण करायची किंवा पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं आणि नोकरीच्या शोधात शहराकडे धाव घ्यायची. मात्र हे सर्व झुगारून भारी या गावातील जय भगत या उच्चशिक्षित तरुणाने जेडी आर्ट, बी.ए., ॲनिमेशन इंजिनिअरिंग अशा उच्चशिक्षित तरुणाने हैदराबाद येथील 35000 रुपये नोकरीवर लाथ मारून घरची शेती करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा घरची मालकी बरी असे म्हणत त्यांनी आपली वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय घेतला खरा मात्र, त्याचे स्वप्न निसर्गाच्या दुष्टचक्रात भंगले भंगणार की काय अशी स्थिती आज निर्माण झाली आहेत. मागील 22 दिवसापासून पाऊस न आल्याने शेतातील कपाशीचे पीक वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. हे एक
प्रातिनिधिक उदाहरण असनु हीच स्थिती आज जील्ह्यातील साडेपाच लाख हेक्‍टरवर लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या कपाशीची आहेत. काही ठिकाणी कपाशीची दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणी झाली आहे. आता मात्र पावसाने खंड दिल्याने संपूर्ण पीकच वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. लागवडीचा हंगामही संपल्याने खरिपाची हे नगदी पीक कपाशी आता याची वाढ खुंटणार आहे. त्यामुळे उत्पादनातही घट येणार आहे. कपाशी लागवडीपासून तर महागडी खते, कीटकनाशक, डवरणी, निंदणीचा आतापर्यंत एकरी सहा ते आठ हजाराच्या खर्च आला. मात्र उत्पादन हाती येणारे हे कमी येणार असल्याने
शेती नुकसानीत आहे. अशातच जर पावसाने दडी मारली तर संपूर्ण खरीप हंगामातील हे नगदी पीक वाया जाणार आहेत अशी खंतही उच्चशिक्षित युवा शेतकरी जय भगत यांनी एटीव्ही शी बोलताना सांगितले. तर निसर्गाची साथ लाभली तरच रब्बी हंगामातील पिके घेण्यावाचून पर्याय राहणार नाही. त्यामुळे
आता भिस्त रब्बी हंगामावर अवलंबुन राहणार आहे.Conclusion:बाइट- उच्चशिक्षित युवा शेतकरी जय भगत
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.